Video : शहराला स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकांची - जितूभाई ठक्कर

क्वॉलिटी सिटी बनविण्याच्या दृष्टीने स्वच्छतेची शपथ उपक्रम

नाशिक | प्रतिनिधी

शहराला स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक नागरीकाची असून शहरासोबतच देशही स्वच्छ ठेवणे सहज शक्य असल्याने प्रत्येकाने या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन क्वालिटी कौंसील ऑफ इंडीयाचे समन्वयक जितूभाई ठक्कर यांनी केले.

नाशिकला देशातील पहिली क्वॉलिटी सिटी बनविण्याच्या दृष्टीने क्वॉलिटी कौन्सिल ऑफ इंडियाच्या सहभागाने हाती घेण्यात आलेल्या क्वॉलिटी सिटी नाशिक या अभियानातील तीन प्रमुख उद्दिष्टांपैकी स्वच्छता हे एक आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत सध्या स्वच्छता पंधरवडा राबविण्यात येत असून दि. २ ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंतीच्या औचित्याने त्याची सांगता होणार आहे. या पंधरवड्यानिमित्त क्वॉलिटी सिटी नाशिक अभियाना अंतर्गत स्वच्छतेसंदर्भात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यानुसार स्वच्छतेची शपथ या उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

या उपक्रमाला शासकीय स्तरावरून बळ मिळाले असून विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी तसे पत्र जिल्हाधिकारी यांनी पाठवले आहे. त्याअनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्यावतीने निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी नाशिक महापालिका, जिल्हा परिषद, शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार आदींना या उपक्रमात सहभागी होण्याबाबत पत्र पाठवले आहे.

Video : शहराला स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकांची - जितूभाई ठक्कर
Nashik News: मिरवणूक मार्गावर खड्ड्यात ट्रक फसला

महानगरपालिका शिक्षणाधिकारी बी. टी. पाटील यांनीही महानगरपालिका क्षेत्रातील शाळांनी असे पत्र पाठवून स्वच्छतेची शपथ घेण्याबाबत सूचित केले आहे. क्वॉलिटी सिटी नाशिक अभियानाच्या सामंजस्य करारामध्ये सहभागी झालेल्या संस्था आणि संघटना तसेच त्यांच्या पदाधिकारी व सदस्यांच्या आस्थापनांमध्येही शपथ देेण्यात आली.

क्वॉलीटीसीटीचे संचालक जितूभाई ठक्कर यांनी स्वच्छतेच्या अभियानाची संकल्पना मांडली व क्वालीटी सिटी उपक्रमाची माहीती देऊन देशातील पहिले क्वालीटी शहर बनवण्यासाठी सर्वांनी यात शतप्रतिशत योगदान देण्याचे आवाहन केले.

Video : शहराला स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकांची - जितूभाई ठक्कर
Panjaka Munde: मराठी असल्याने पंकजा मुंडेंनाही मुंबईत घर नाकारलं; व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या...

यावेळी स्वामी कंठानंदजी यांनी स्वच्छतेची शपथ दिली. यावेळी क्वालिटी कौंन्सिल ऑफ इंडीयाचे मधु अहलूवालीया, नॅञशनल अ‍ॅक्रिडेशन बोर्ड ऑफ एज्यूकेशन अ‍ॅण्ड ट्रेनिंगचे मुख्य कार्यकारी अधिकारी बरिंदर सिंग तसेच क्वॉलिटी सिटी उपक्रमाच्या सुकाणू समितीचे पदाधिकारी आशिष कटारीया, कृणाल पाटील, अरविंद महापात्रा, हेमंत राठी, सचिन गुळवे, नरेंद्र कुलकर्णी, संदिप कुयटे, सचिन अहिरराव आदींसह पदाधिकारी होते.

मविप्रच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात संस्थेचे सरचिटणिस अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. आभार आशिष कटारीया यांनी मानले. यावेळी मविप्रचे विविध शाखांंचे प्राचार्य, शिक्षणाधिकारी, एनसीसी,एनएसएससह विद्यार्थी मोठ्या संख्यने उपस्थित होते.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com