अमृत महोत्सवानिमित्त मालेगाव मनपाचे विविध उपक्रम

अमृत महोत्सवानिमित्त मालेगाव मनपाचे विविध उपक्रम

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

महानगरपालिकेतर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 12 ते 15 ऑगस्ट दरम्यान विविध विभागांचे अधिकारी,

सेवक तसेच 50 विविध शाळेंच्या दोन दिवस तिरंगा रॅलीसह (Tricolor rally) आरोग्य (health), स्वच्छता, कला, क्रिडा, लसीकरण अभियान (Vaccination campaign), माजीसैनिक सत्कार, हर घर तिरंगा, मेहंदी व कुस्ती स्पर्धा, व्याख्यान आदी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रशासक-आयुक्त भालचंद्र गोसावी (Administrator-Commissioner Bhalchandra Gosavi) यांनी दिली.

मनपा सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत आयुक्त भालचंद्र गोसावी (Commissioner Bhalchandra Gosavi), अतिरिक्त आयुक्त गणेश गिरी (Additional Commissioner Ganesh Giri) यांनी अमृत महोत्सवानिमित्त मनपातर्फे आयोजित विविध उपक्रमांची माहिती देत हे उपक्रम यशस्वी करण्यासाठी शहरवासियांनी मोठ्या संख्येने सहभाग घेण्याचे आवाहन केले. उपायुक्त सुहास जगताप, लेखाधिकारी राजू खैरनार, सहाय्यक आयुक्त सचिन महाले, आरोग्याधिकारी डॉ. सपना ठाकरे, शहर अभियंता कैलास बच्छाव, जयपाल त्रिभुवन, जनसंपर्क अधिकारी पंकज सोनवणे आदी यावेळी उपस्थित होते.

हर घर तिरंगा (Har Ghar Tiranga) या उपक्रमासाठी प्रशासनाने 75 हजार झेंड्यांचे लक्ष्य ठेवले असून मुख्य कार्यालयातील संकिर्ण कर विभागासह मनपाच्या चारही प्रभाग कार्यालयात झेंडे उपलब्ध करून देण्यात आले असल्याची माहिती देत आयुक्त गोसावी पुढे म्हणाले, शहरातील विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी व सेवकांची 12 ऑगस्टरोजी पालिका मुख्यालयापासून तिरंगा रॅली (Tiranga Rally) काढली जाणार असून तिची सांगता हुतात्मा स्मारकाजवळ तर 13 ऑगस्टरोजी शहरातील 50 विविध शाळांतर्फे एकात्मता रॅली काढली जाणार असून या रॅलींची सांगता एकात्मता चौकातील पोलीस कवायत मैदानावर होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कारगिल विजय दिनापासून (Kargil Victory Day) अमृत महोत्सवास मनपातर्फे प्रारंभ करण्यात येवून 70 माजीसैनिकांचा सत्कार करण्यात येवून त्यांना मालमत्ता करात सूट देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देत आयुक्त गोसावी पुढे म्हणाले, 12 ते 15 ऑगस्ट दरम्यान मिशन महेफूज (Mission Mahfooz) अंतर्गत लहान मुलांसाठी व्यापक लसीकरण अभियान (Vaccination campaign) राबविले जाणार आहे. नागरी आरोग्य केंद्रासह वेगवेगळ्या ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी अभियानास (Health screening campaign) देखील व्यापक प्रतिसाद मिळत आहे.

लसीकरण जनजागृती, स्वच्छता मोहिम, शाळेंमध्ये विद्यार्थ्यांसाठी (students) हात धुवा जनजागृती तसेच बुस्टर डोस (Booster dose) सर्वांसाठी मोफत हे अभियान देखील तीन दिवस राबविला जाणार आहे. मालमत्ता कर थकबाकीदारांच्या व्याजात 75 टक्के सुट देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला असल्याची माहिती आयुक्त गोसावी यांनी दिली.

अमृत महोत्सव साजरा करतांना शहरातील सर्व राष्ट्रपुरूषांच्या पुतळ्यांना तिरंगा रंगात विद्युत रोषणाई केली जाणार असून 14 ठिकाणी दंतरोग शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. दिलावर हॉलमध्ये महिलांसाठी व्याख्यान व मेहंदी स्पर्धा होणार असून 15 ऑगस्टरोजी कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली आहे. नागरीकांनी घरावर तसेच आस्थापना व कार्यालयांवर तिरंगा ध्वज लावतांना ध्वजसंहितेचे पालन करावे, असे आवाहन अतिरिक्त गणेश गिरी यांनी यावेळी केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com