कौतुकास्पद ! पाण्यासाठी काहीही..! ८४ वर्षीय आजीबाईचे पाण्यासाठी योगदान

उंबरपाडा येथील कुटुंबाने बांधला वनराई बंधारा
कौतुकास्पद ! पाण्यासाठी काहीही..! ८४ वर्षीय आजीबाईचे पाण्यासाठी योगदान

हरसूल | Harsul

जल है तो कल है, या वाक्याची आठवण करून ८४ वर्षीय आजीबाईने वनराई बंधारा बांधण्यासाठी श्रमदान केले.

गेल्या काही दिवसापासून जलपरिषदे च्या माध्यमातून हरसूल परिसरात १०१ वनराई बंधारे बांधण्याचा संकल्प केला आहे. या संकल्पातून हरसूल जवळील उंबरपाडा येथील कुटुंबाने वनराई बंधारा बांधला आहे. या कामी कुटुंबातील ८४ वर्षीय आजीबाईचे श्रमदान कौतुकाचा विषय ठरला आहे.

त्र्यंबकेश्वर, पेठ तालुक्यात जलपरिषद अंर्तगत मिशन जलपरिषद वनराई बंधारा मोहीम राबविण्यात येत आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी वनराई बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात येत आहे. त्यापैकीच उंबरपाडा (राजीवनगर) येथे या ठिकाणी वनराई बंधारा बांधण्यात आला.

यावेळी मनोहर राऊत, सिताराम भोये, यमुना भोये, भीमा भोये, जयश्री राऊत, वैशाली राऊत, लक्ष्मीबाई महाले, जनार्धन राऊत, चेतन राऊत आदींसह जलपरिषद मित्र अनिल बोरसे, पोपट महाले उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com