‘देशदूत’ वृत्ताची दखल: वणी रुग्णालयातील रिक्त पदे भरणार : डॉ. पवार

‘देशदूत’ वृत्ताची दखल: वणी रुग्णालयातील रिक्त पदे भरणार : डॉ. पवार

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

वणी (vani) येथील ग्रामीण रुग्णालयाच्या (Rural Hospital) बिघडलेल्या आरोग्याबाबत ‘दैनिक देशदूत’ (deshdoot) ग्रामस्थांच्या प्रश्नांचा आवाज उठवताच केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar) यांनी तातडीने दखल घेत वणी ग्रामीण रुग्णालयाबाबतचा प्रश्न मार्गी लावण्याबाबात जिल्हा आरोग्य विभागाला (Department of Health) आदेश दिला आहे.

दरम्यान जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. अशोक थोरात (District Surgeon Dr. Ashok Thorat) यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचे कार्यालयीन सचिव डॉ. प्रशांत खैरे, नारायण गावित व ग्रामस्थ प्रतिनिधी यांची बैठक घेत वणी ग्रामिण रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिक्षक व रुग्णवाहिकेचा प्रश्न मार्गी लावला आहे. दिंडोरी तालुक्याचा (dindori taluka) पश्चिम भाग, सुरगाणा (surgana) तसेच कळवण (kalwan) व चांदवड (chandwad) तालुक्यातील साठ ते सत्तर गावांचे मध्यवर्ती व संवेदनशील असलेल्या वणी ग्रामीण रुग्णालयात गेल्या आठ महिन्यांपासून वैद्यकिय अधिक्षक पद (post of Medical Superintendent), वैद्यकिय अधिकार्‍याचे पद रिक्त आहे.

त्यात अतिरीक्त कार्यभार असलेले दिंडोरी रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. विलास पाटील (Medical Superintendent Dr. Vilas Patil) हे कार्यालयीन कागदपत्रांची पूर्तता करण्या इतपतच वणी ग्रामीण रुग्णालयात हजेरी लावत असल्याने वणी ग्रामिण रुग्णालयाचे कर्मचार्‍यांवर अंकुश नसल्याकारनाने आरोग्य सेवा सैरभैर होवून याचा परिणाम आरोग्य सेवेवर होवून रुग्णांना आवश्यक व तातडीचे उपचार मिळणे दुरापास्त झाले होते. याबाबत ग्रामस्थांनी ग्रामसभेतही प्रश्न उपस्थित करीत कार्यवाही करण्याची मागणी केली होती. दरम्यान याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने विधान सभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Deputy Speaker of the Legislative Assembly Narhari Jirwal) यांच्याकडे याबाबतची तक्रार केली असता.

झिरवाळ यांनी तातडीने याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांना दिले होते. त्यानूसार जिल्हा निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. पाटील यांनी वणी ग्रामीण रुग्णालयास भेट देत रुग्णालयाच्या कर्मचारी यांची बैठक घेत कामकाज सुधारण्याबाबत सुचना केल्या होत्या. ग्रामस्थांच्या तक्रारी जाणून घेवून कार्यवाही करणार असल्याचे सांगितले होते. मात्र त्याच दिवशी दुचाकी अपघातात जखमी झालेल्यांवर रुग्णालयात वैद्यकिय अधिकारी वेळेवर उपस्थित नसल्याची बाब समोर आल्यानंतर दैनिक देशदूतने बातमीच्या माध्यमातून आवाज उठवत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री व विधानसभेचे उपाध्यक्षांच्या मतदार संघातील रुग्णालयातच रुग्णांची होत असलेली परवडीचा बातमीत उल्लेख केला होता.

दरम्यान सुरगाणा पंचायत समितीचे सदस्य व डॉ. भारती पवार (dr. bharti pawar) यांचे निकटवर्तीय एन. डी. गावीत यांनी सामाजिक कार्यकर्ते रविकुमार सोनवणे व सकाळचे बातमीदारांशी प्रत्यक्ष संपर्क साधून ग्रामिण रुग्णालयाची सविस्तर माहीती घेवून दैनिक देशदूतमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आरोग्यराज्य मंत्री डॉ. भारती पवार यांना पाठविल्या होत्या. याबाबत त्यांनी लागलीच जिल्हा आरोग्य विभागास वणी ग्रामिण रुग्णालयाचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचा आदेश दिला असता जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. अशोक थोरात यांनी आरोग्यमंत्र्यांचे कार्यालयीन सचिव डॉ. प्रशांत खैरे, पंचायत समिती सदस्य नारायण गावित,

ग्रामस्थ प्रतिनिधी महेेंद्र पारख, किरण गांगुर्डे, सतिश जाधव, कुंदन जावरे आदींसह अधिकार्‍यांची बैठक घेत वणी ग्रामिण रुग्णालयाचे अतिरीक्त कार्यभार असलेल्या डॉ. विलास पाटील यांच्या जागी कळवण उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. अनंत पवार यांच्याकडे पदभार दिला आहे. तसेच नादुरुस्त असलेली रुग्णवाहिकेच्या जागी नवीन 102 रुग्णवाहिका देण्याबाबत कार्यवाही केली आहे. तसेच रुग्णालयात पूर्णवेळ वैद्यकिय अधिकारी उपस्थित राहाण्याबरोबरच रुग्णालयात आलेला रुग्ण अत्यावश्यक वाटल्यासच जिल्हा रुग्णालयात हलविण्याच्या सुचना करण्यात आल्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com