खडांगळीच्या वंदना ठोक यांची पीएसआय पदी निवड

महिला खुल्या प्रवर्गातून ११ वी, दुसऱ्यांदा पीएसआय पदी निवड
खडांगळीच्या वंदना ठोक यांची पीएसआय पदी निवड

सिन्नर । Sinnar

सिन्नर तालुक्यातील (Sinnar Taluka) खडांगळी येथील वंदना राणूबा ठोक (Vandana Ranuba Thok) या विद्यार्थीनीची दोनदा पीएसआय (Selection as PSI) पदी निवड झाली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे(MPSC) घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक व सहाय्यक कक्षाधिकारी - 2016 (Sub-Inspector of Police and Assistant Class Officer) या संयुक्त परीक्षांच्या पोलीस उपनिरीक्षक अंतीम प्रतिक्षा यादीचा निकाल (Final waiting list result) आज जाहीर झाला. त्यात नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील खंडागळी (Khadangali Village) या लहानशा खेड्यागावातील विद्यार्थींनी वंदना ठोक ही विद्यार्थींनी यशस्वी झाली आहे.

विशेष म्हणजेच त्यांची प्रथम खात्यातंर्गत पीएसआय पदी निवड झाली आहे. आता नुकतीच पोलीस उपनिरीक्षक अंतिम प्रतिक्षा यादी 57 उमेदवारांची जाहीर झालेली आहे. त्यात वंदना ही महिला खुल्याप्रवर्गातून (Open Category) ११ वी आलेली आहे.

जळगांव (Jalgoan) येथील स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील (Competitive Exams) अग्रगण्य असलेल्या दर्जी फाऊंडेशनच्या (Darji Foundation) मार्गदर्शनाने वंदना ठोक हिने यश संपादन केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com