राजमाता अहिल्याबाई होळकर सभागृहात तोडफोड

राजमाता अहिल्याबाई होळकर सभागृहात तोडफोड

नवीन नाशिक | प्रतिनिधी | Navin Nashik

कामटवाडे (Kamtwade) शिवारातील राजमाता अहिल्याबाई होळकर सभागृह (Rajmata Ahilyabai Holkar Auditorium) इंद्रानगरी येथे अज्ञात समाजकंटकांनी सभागृहातील सामानाचे नुकसान करून याठिकाणी मद्याच्या बाटल्या फोडल्याची घटना घडली.

राजमाता अहिल्याबाई होळकर सभागृह इंद्रानगरी (Indranagari) येथे लहान मुलांसाठी विविध प्रकारच्या प्रशिक्षणाचे वर्ग भरवले जातात. यामुळे येथील बाळगोपाळांना ईतर उपक्रमांसाठी बाहेर जाण्याची आवश्यकता भासत नाही. मात्र अज्ञात समाजकंटकांनी याठिकाणी असलेले विजेचे बोर्ड (Electrical board) तोडून मद्याच्या बाटल्या फोडून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान या घटनेची माहिती समजताच शिवसेना विभागप्रमुख पवन मटाले (Shiv Sena Division Chief Pawan Matale) यांनी याठिकाणी पाहणी करत अंबड पोलिसांना (Ambad Police) सदर घटनेची माहिती दिली. यावेळी अंबड पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे (Crime Squad) सपोनी गणेश शिंदे व पथकाने सदर ठिकाणी येत परिसराची पाहणी करून संबंधित संशयितांचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com