पंचायत समितीत साहित्याची तोडफोड

पंचायत समितीत साहित्याची तोडफोड

सिन्नर । वार्ताहर sinnar

पंचायत समितीच्या जलसंधारण, लघु पाटबंधारे उपविभागातील कार्यालयात संगणक, प्रिंटर व शासकीय कर्मचार्‍याचा मोबाईल जमिनीवर आपटून नुकसान केल्याची घटना घडली.

याप्रकरणी पांगरी येथील भाऊसाहेब बैरागी यांच्या विरोधात शासकीय कर्मचाजात अडथळा आणून धक्काबुक्की व शिवीगाळ केल्याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पंचायत समितीच्या जलसंधारण, लघु पाटबंधारे उपविभागातील कार्यालयातील कनिष्ठ अभियंता आनंद तुळशीराम पाटील (40) हे काम करीत असतांना बैरागी यांनी कार्यालयात प्रवेश केला.

पाटील शासकीय काम करत असताना संगणक, प्रिंटर, त्यांचा मोबाईल आपटून नुकसान केले. पाटील यांनी विचारणा केल्यानंतर त्यांची गच्ची पकडून धक्काबुक्की करत शिवीगाळ व दमदाटी केली. याबाबत पाटील यांनी सिन्नर पोलिसांत फिर्याद दिली.

पोलिसांनी संशयित बैरागी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन आवारी पुढील तपास करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com