त्र्यंबकेश्वर मंदिरातील पिंडीवर लवकरच वज्रलेप करणार?

त्र्यंबकेश्वर मंदिरातील पिंडीवर लवकरच वज्रलेप करणार?

त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी | Trimbakeshwar

त्र्यंबकेश्वर मंदिरातील (Trimbakeshwar temple) महादेवाच्या पिंडीची झीज होत असून पिंडीवर (Pindi) लवकरच वज्रलेप करण्यात येईल असे संकेत मिळत आहे. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय उद्या (सोमवारी) पुरातत्व खात्याच्या (Department of Archaeology) अधिकाऱ्यांच्या पाहणी व निरीक्षणानंतर होणार आहे...

त्र्यंबकेश्वर येथील शिवलिंगाची रचना इतर स्थानांपेक्षा वेगळी आहे. येथे पिंडीवर शाळुंका नसून, योनीस्वरूप असलेल्या शिवलिंगात बह्मा, विष्णू, महेश असे तीन उंचवटे आहेत. या उंचवट्यांवर असलेला कंगोरा, त्याला स्थानिक लोक ‘पाळ’ असे म्हणतात. त्या पाळाचा ‘टवका’ निखळू लागला आहे. वेळीच उपाययोजना न केल्या गेल्यास आणखीही नुकसान होण्याची भीती आहे.

तसेच हा प्रकार गुरुवारी (दि.१५) रोजी लक्षात आल्यानंतर देवस्थान ट्रस्ट (Devasthan Trust) केंद्रीय पुरातत्व विभाग आणि पोलिस (police) यांना कळविण्यात आले आहे. तसेच आतील शिवलिंगे सुरक्षित असून झीज झालेल्या ठिकाणी वज्रलेप सुद्धा होण्याची शक्यता आहे. तर त्र्यंबकेश्वर मंदिर हे केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारित येत असल्याने पुरातत्व विभागाचे अधिकारी याठिकाणी उद्या (सोमवारी) पाहणी करणार आहेत.

दरम्यान, यापूर्वी २००६ मध्ये लेपन करण्यात आले होते. तसेच वेळोवेळी काही पिंडीची झीज होऊ नये म्हणून नियम घालून देण्यात आले होते. परंतु यातील काही नियम पाळले गेले तर काही पाळले गेले नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com