जामगाव सोसायटीवर वाजे गटाचे वर्चस्व

जामगाव सोसायटीवर वाजे गटाचे वर्चस्व

सिन्नर । वार्ताहर | Sinnar

तालुक्यातील जामगाव (Jamgaon) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या (Executive Service Cooperative Society) पंचवार्षिक निवडणूकीत (election) माजी आमदार राजाभाऊ वाजे (Former MLA Rajabhau Vaje) गटाच्या जनसेवा पॅनलने 13 पैकी 13 जागा जिंकत विरोधी पॅनलला धुळ चारली.

जामगाव येथे सोसायटी स्थापन झाल्यापासून संचालक मंडळाची बिनविरोध निवड होत होती. मात्र, यंदा प्रथमच सोसायटीच्या निवडणूकीसाठी मतदान प्रकिया (Voting process) पार पडली. पंचायत समितीचे माजी सदस्य संजय सानप (Former member of Panchayat Samiti Sanjay Sanap) यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा पॅनलने सर्वच्या सर्व जागा जिंकत विरोधी गटाला शह दिला. सर्वसाधारण गटात जनसेवाचे नवनाथ सदाशिव आव्हाड (121), वाळीबा बाळाजी आव्हाड (123), शिवाजी आनंदा कातकाडे (120), दिगंबर मधुकर बोडके (119), फक्कड शिवराम बोडके (108), सुरेश कोडांजी बोडके (113), एकनाथ धोडिंबा सानप (119),

लक्ष्मण शंकर सानप (116) हे विजयी झाले. त्यांनी शंकर गणपत आव्हाड (108), धनंजय प्रभाकर कातकाडे (108), अंबादास त्र्यंबक बोडके (102), दामु टल्लू बोडके (103), भरत दत्तात्रय बोडके (101), रतन गोपिनाथ बोडके (97), शिवराम यशवंत बोडके (99), शंकर विठोबा बोडके (96) यांना पराभूत केले. विशेष मागास प्रवर्गातून दौलत अमृता बोडके (124) यांनी विश्वास यशवंत बोडके (104) यांना पराभूत केले.

महिला राखीव गटातून सुरेखा सावकार बोडके (118), सिताबाई उत्तम खोकले (126) यांनी छाया गणपत बोडके (106), यमुना दशरथ बोडके (104) यांचा पराभव केला. इतर मागास प्रवर्गातून संदिप सुकदेव शिंदे (126) यांनी भाऊसाहेब सुकदेव शिंदे (104) यांचा पराभव केला. अनुसुचित जाती प्रवर्गातून त्र्यंबक यशवंत तळपे (127) यांनी कारभारी भिवाजी खोकले (107) यांचा पराभव केला. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून एस. जी. वाघ यांनी काम बघितले. निकालानंतर समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला.

Related Stories

No stories found.