वाचन प्रेरणा दिन : सुसंस्कारित समाज निर्मितीसाठी वाचन आवश्यक

कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालय
वाचन प्रेरणा दिन : सुसंस्कारित समाज निर्मितीसाठी वाचन आवश्यक

पिंपळगाव (ब) | Pimpalgaon

पिंपळगाव बसवंत येथील कर्मवीर काकासाहेब वाघ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात आला.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दिलीप शिंदे यांच्या शुभहस्ते भारतरत्न डॉ. ए,पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

प्राचार्य डॉ दिलीप शिंदे यावेळी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, सुसंस्कारीत समाज निर्मितीसाठी वाचन आवश्यक आहे. वाचनासाठी ईबुक्स, डिजीटल माध्यामा सारख्या अनेक नवनवीन साधने उपलब्ध आहेत. याचा लाभ विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे. काळ बदलला तरी वाचनाचे महत्व कमी होत नाही.

युवकांना प्रेरणा देण्याचे कार्य महापुरुषांचे जीवनचरित्र करीत असतात. म्हणून त्यांना समजून घेण्यासाठी त्यांचे जीवनचरित्र वाचने आवश्यक आहे. डॉ भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी परिस्थितीशी संघर्ष करून स्वतःची ओळख तयार करून समाजासमोर आदर्श निर्माण केला.

म्हणून आज आपण त्यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करीत आहोत, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com