पेठ । Peth

पेठ ग्रामीण रुग्णालयात करोना लसीकरणाचा फज्जा उडाला असून ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.

करोनाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी शासनस्तरावरुन युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी करोना लस उपलब्ध करुन देण्यात आली असून पेठ तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्रामधून लसीकरणास सुरवात झाली आहे. परंतु पेठच्या ग्रामीण रुग्णालयात लसीकरणासाठी सेवक नसल्याचे कारण देऊन नागरीकांना लसीकरणा पासून वंचीत ठेवण्यात आले आहे.

कुंभाळे प्राथमिक केंद्राच्या कर्मचाऱ्यांकरिता चार पाच दिवस लसीकरण करण्यात आले. त्यानंतर अनेक वयोवृद्ध नागरीक लस प्राप्त होईल, या आशेवर ग्रामीण रुग्णालयात येऊन लसीकरण केंद्र बंद असल्याचे पाहून हताश मनाने माघारी जात असल्याचे चित्र दिसुन येते.