देसराणे l Desrane (वार्ताहर) :

कळवण उपजिल्हा रुग्णालयात आज सकाळी ११ वाजता कोवीड-१९ वर प्रभावी ठरलेली भारतीय कोरोना लस देण्यास सुरवात झाली आहे.

रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सुभाषसिंग परदेशी यांना लस देऊन शुभारंभ कऱण्यात आला. टप्याटप्याने १०० आरोग्य सेवकांना कोरोना लस दिली जाणार आहे.

कळवण उपजिल्हा रुग्णालयात ३५० कर्मचाऱ्यांना दिले जातील एव्हडे डोजेस आलेले आहेत. पैकी आज १०० डोसेस तालुक्यातील प्रथम फळीच्या आरोग्य सेवकांना दिले जाणार आहेत. लस घेण्यासाठी कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह दिसून आला.

यावेळी उपजिल्हा रुग्णलायचे अधीक्षक डॉ. सुभाषसिंग परदेशी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर पाटील, डॉ. प्रल्हाद चव्हाण, डॉ. गिरीश देवरे सहपरिचारिका व इतर कर्मचारी उपस्थित होते.

उपजिल्हा रुग्णालय कळवण-करोना लसीबाबत सोशल मीडियावर करोना लसीबाबत अनेक अफवा पसरविल्या जात आहेत. भारताने लसीचा शोध लावला आहे. हि आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. हे लक्षात घेऊन सर्व कोरोना योध्यांनी लस घ्यावी.
डॉ. सुभाषसिंग परदेशी, वैद्यकीय अधीक्षक

करोना काळात घाबरून न जाता आम्ही संपूर्ण रुग्णालय स्वच्छ ठेवण्याचे काम केले आहे. शासनाने लस येताच डॉक्टर, परिचारिका आरोग्य सेवक यांच्या सोबत आम्हालाही लस दिल्याने आमच्या कामाचे सार्थक झाले आहे.
प्रकाश पगार, सफाई कर्मचारी