मे अखेरपर्यंत लसीचा तुटवडा दूर होणार

पालकमंत्री भुजबळ : परिस्थितीत सुधारणा
मे अखेरपर्यंत लसीचा तुटवडा दूर  होणार

नाशिक । Nashik

ऑक्सिजन आणि रॅमिडीसिव्हर तक्रारी कमी झाल्या आहेत. राज्यभर ऑक्सिजनचा तुटवडा आहे.ऑक्सिजनची खातरजमा असल्या शिवाय ऑक्सिजन बेड वाढवणे योग्य नाही.

लसिंचा तुटवडा आहे पण मला कोणाला दोष द्यायचा नाही असे सांगत मे अखेरपर्यंत सर्वांना लस उपलब्ध होईल, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

जिल्हानियोजन भवनात करोना आढावा बैठकीनंतर शनिवारी (दि.८) पत्रकार परिषदेत ते बोलत होते.दर आठवडयाला आम्ही बैठक घेतो. आज सर्व लोकप्रतिनिधींची बैठक बोलावली होती. आता आकडा वाढतोय. अनेक ठिकाणी लॉकडाउन लावला आहे.काही जिह्यानी लॉक डाउन केला आहे. याबाबत माहिती घेतली.आता सर्व विचार लक्षात घेता निर्णय घेऊ.

आदिवासी भागात लस घेत नाहीत. नॉर्मल उपचार करूम घरीच राहतात. मात्र आता त्यावर उपाय योजना करु. नरहरी झिरवाळ त्यात लक्ष घालतील.

लसीकरण केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. १८ वर्षाच्या वरील लोकांना लस देणार आहोत. पण लस उपलब्ध नाही कशी देणार. मे अखेरपर्यंत पर्यँत लस उपलब्ध होईल व त्यानंतर ही प्रक्रिया सुरळीत होईल असे त्यांनी सांगितले.

आ.डाॅ. राहुल आहेर यांना टोला

करोना आढावा बैठकीत आ.डाॅ.राहुल आहेर यांनी उयाययोजना कागदावरच असल्याचा आरोप केला. त्यांना भुजबळ यांनी टोला लगावत बैठक ऐकमेकांवर आरोप करण्यासाठी नव्हती असा टोला लगावला.

जिल्ह‍ा रुग्णलयात बेड वाढवला नाही हा आहेर यांचा मुद्दा योग्य वाटत नाही. आरोप करण्यासाठी मीटिंग नव्हती असे ते म्हणाले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com