सातपूर रुग्णालयात लसीचा तुटवडा

सातपूर रुग्णालयात लसीचा तुटवडा

अधिकार्‍यांचा धक्कादायक खुलासा

सातपूर । Satpur

सातपुर कॉलनीतील मनपा रुग्णालयात पहिली लस घेवुन झाल्यानंतर दुसरी लस घेण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ नागरिकांना थेट शासनाकडे पैसेच नसल्याने दुसरी लस देता येणार नसल्याचे सांगून हुसकावून लावल्याचे समजताच चौकशीसाठी गेलेल्या नगरसेवकांशी असहकाराच्या भूमिकेमुळे संताप व्यक्त होत आहे.

अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या दूसरा डोज देताना सदर वैद्यकीय अधिकार्‍यांनी डोस नसल्याचं सांगत शासनाकडे पैसे नसल्याचे सांगितले.

नागरिकांच्या तक्रारीवरुन प्रभागातील नगरसेवक सलीम शेख यांनी संबंधित मनपा रुग्णालयाला भेट दिली असता आजच रुजू झालेल्या महिला वैद्यकीय अधिकारी, डॉक्टरांनी नगरसेवक सलीम शेख यांनाही शासनाकडे पैसे नसल्याने कोविड लस देता येणार नसल्याचे धक्कादायक उत्तर दिल्याने शेख संतापले.

या उत्तराने दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. याविषयी प्रतिक्रिया घेण्यासाठी गेलेल्या माध्यम प्रतिनिधींसह मनसे कार्यकर्त्यांना कोंडुन घ्या, रुग्णालयाचा गेट लावुन घ्या असे आदेश सदर वैद्यकीय अधिक्षकांनी आपल्या कर्मचार्‍यांना दिल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com