लस सुरक्षित; अफवांकडे दुर्लक्ष करा

तिसरी लाट रोखण्यासाठी नागरिकांनी लसीकरण करावे : मांढरे
लस सुरक्षित; अफवांकडे दुर्लक्ष करा

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

करोना (corona) प्रतिबंधक लसीकरणाचे (vaccination) कुठलेही दुष्पपरिणाम दिसून आलेले नाही तसेच लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरीकांना ओमायक्रॉन विषाणूचा (Omecron virus) धोका खुपच कमी आहे.

त्यामुळे शहरातील जनतेने अफवांवर अथवा चुकीच्या माहितीवर विश्वास न ठेवता त्वरीत लसीकरण (vaccination) करून घेत तिसर्‍या लाटेचे संकट थोपविण्यासाठी प्रशासनास सहकार्य करण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन करत जिल्हाधिकारी सुरज मांढरे (Collector Suraj Mandhare) यांनी शहरात लसीकरणाचे प्रमाण अत्यंत कमी असल्याबद्दल चिंता व्यक्त करत लसीकरण कसे वाढेल याबाबत मनपा (nashik municipal corporation) व आरोग्य विभागाने (Department of Health) तातडीने लक्ष देण्याची सुचना केली.

शहरात करोना लसीकरणाचे कमी असलेले प्रमाण तसेच महसुल विभागाच्या (Department of Revenue) कार्यालयांची तपासणीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी मालेगावी (malegaon) भेट देत आढावा घेतला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी माया पाटोळे (Upper Collector Maya Patole), मनपा आयुक्त भालचंद्र गोसावी (Municipal Commissioner Bhalchandra Gosavi), प्रांत विजयानंद शर्मा, तहसीलदार चंद्रजित राजपूत (Tehsildar Chandrajit Rajput), पोलीस उपअधिक्षक प्रतापराव जाधव (Deputy Superintendent of Police Prataprao Jadhav), आरोग्याधिकारी डॉ. सपना ठाकरे (Health Officer Dr. Sapna Thackeray) आदी अधिकारी उपस्थित होते.

यावेळी शहरात करोना लसीकरणासाठी होत असलेल्या उपाययोजनांचा आढावा जिल्हाधिकार्‍यांनी घेतला. लसीकरणाचे प्रमाण कमी असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त करीत लसीकरणाचा वेग कसा वाढेल या दृष्टीकोनातून मनपा व आरोग्य विभागाने लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. ओमायक्रॉन विषाणूचे संकट उभे ठाकले असून प्रादुर्भावाचा वेग लक्षात घेता आगामी फेब्रुवारीत तिसरी लाट येण्याचा धोका आहे. लस घेतलेल्या नागरीकांना ओमायक्रॉन विषाणूचा धोका कमी असल्याचे निदर्शनास आले आहे.

त्यामुळे लसीकरणच तिसर्‍या लाटेचे संकट थोपविण्यास सक्षम ठरत असल्याने नागरीकांनी दोन्ही डोस घेत सुरक्षित होण्याची गरज व्यक्त करत जिल्हाधिकारी मांढरे पुढे म्हणाले, मालेगाव पहिल्या व दुसर्‍या लाटेत राज्यात हॉटस्पॉट ठरले होते. या दोन्ही लाटेत झालेली हानी नागरीकांनी लक्षात घेण्याची गरज आहे. या लाटेंच्या काळातील उपचार पध्दत व आताच्या उपचार पध्दतीत देखील बदल दिसत आहे.

दुसर्‍या लाटेत रूग्णांना ऑक्सीजनची (Oxygen) गरज भासत होती मात्र ओमायक्रॉन बाधीत रूग्णांना ऑक्सीजनची गरज पडत नसल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मनपा व सामान्य रूग्णालयाचे प्राणवायू प्रकल्प तातडीने पुर्ण करण्याच्या दृष्टीकोनातून सुचना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले. लसीकरणाबाबत शहरात वेगवेगळ्या अफवा पसरविल्या जावून चुकीची माहिती दिली जात आहे. लसीकरणाचे कुठलेही दुष्पपरिणाम नाही. तसेच करोना थोपविण्यासाठी प्रतिबंधक लसच प्रभावी ठरत आहे. त्यामुळे शहरातील नागरीकांनी अफवांवर विश्वास न ठेवता तातडीने लसीकरण पुर्ण करून घेत प्रशासन यंत्रणेस सहकार्य करावे, असे आवाहन मांढरे यांनी केले.

तहसीलमध्ये लसीकरण केंद्र

प्रांत-तहसील कार्यालयाची पाहणी करतांना जिल्हाधिकार्‍यांनी कर्मचार्‍यांच्या कोविड लसीकरण प्रमाणपत्राची तपासणी देखील केली. महसुल विभागाच्या कार्यालयांमध्ये गुरूवारपासून नो व्हॅक्सींन नो एन्ट्री (No vaccine, no entry) नियमाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. या नियमांचे पालन देखील कटाक्षाने करण्याचे निर्देश देत जिल्हाधिकारी मांढरे यांनी तहसील कार्यालयात तातडीने लसीकरण केंद्र सुरू करण्याची सुचना केली. मनपा आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी तातडीने आरोग्य पथक नियुक्त करत तहसीलमध्ये लसीकरण केंद्रास (Vaccination Center) प्रारंभ केला.

महसुल कार्यालयांच्या तपासणी अंतर्गत जिल्हाधिकारी मांढरे यांनी महसुलच्या लिपीकांची दप्तर तपासणी केली. यानंतर त्यांनी थेट शहरातील आंबेडकरनगर व पाटकिनारा भागास भेट देत तेथे असलेल्या शासकीय धान्य दुकानांची पाहणी केली. यावेळी परिसरातील नागरीकांशी चर्चा करतांना जिल्हाधिकार्‍यांनी नियमित धान्य मिळते कां? काही तक्रार आहे कां? अशी पृच्छा नागरीकांना केली.

यानंतर प्रांत कार्यालयात शहरातील भुईकोट किल्ला परिसरातील अतिक्रमणासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थितीत ऑनलाईन बैठक घेण्यात आली. व्यावसायिक तसेच घरगुती अतिक्रमणधारकांची संख्या मनपातर्फे निश्चित करण्यात आली असून घराचे अतिक्रमण असलेल्यांना म्हाळदे शिवारातील घरकुल योजनेत लाभ दिला जाणार आहे. या संदर्भात मनपाने पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे अहवाल पाठविला असल्याची माहिती मनपा आयुक्त गोसावी यांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com