दाखल्यांसाठी लसीचे प्रमाणपत्र बंधनकारक

जानोरीच्या विशेष ग्रामसभेत ठराव
दाखल्यांसाठी लसीचे प्रमाणपत्र बंधनकारक

जानोरी । वार्ताहर Janori

करोनापासुन (corona) बचाव करण्यासाठी लसीकरण (vaccination) हा एकमेव पर्याय असल्याने गावात लसीकरण शंभर टक्के होणे अपेक्षित आहे. यासाठी ग्रामपंचायतीचे कोणतेही शासकीय कागदपत्रे (Government documents) देतांना दोन्ही लसीकरण घेतल्याचे प्रमाणपत्र (Certificate of vaccination) घेण्यात यावे अन्यथा शासकीय कागदपत्रे देवू नये असा ठराव जानोरी ग्रामपंचायतीच्या (janori grampanchayat) विशेष ग्रामसभेत (vishesh gramsabha) घेण्यात आला.

मागील दोन वर्षांपासून करोना सदृश परिस्थितीमुळे ग्रामसभा प्रलंबित होते. नुकतेच विशेष ग्रामसभा घेण्याबाबत शासनाकडून हिरवा कंदील देण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर जानोरी गावची ग्रामसभा प्रशासक अण्णा गोपाळ यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सभागृहात संपन्न झाली. यावेळी गावचे शंभर टक्के लसीकरण करण्यासाठी पुर्ण गावाचे लसीकरण होण्यासाठी ग्रामपंचायतीचे शासकीय दाखले देताना दोन्ही लसीकरण घेतल्याचे प्रमाणपत्र घेतल्याशिवाय देवू नये असा ठराव संमत करण्यात आला.

त्याचबरोबर हागणदारीमुक्तिसाठी ग्रामपंचायतीकडून विशेष प्रयत्न केले जावे तसेच शौचालयासाठी अनुदान घेऊन त्याचा वापर न करणार्‍यांवर कारवाई करण्यात यावी तसेच दुबार मतदार नोंदणी (Double voter registration) असणार्‍यांची चौकशी करून कारवाई करणे, पुढील वर्षासाठी अंदाजपत्रक तयार करणे, तसेच गट नंबर 1124 मध्ये अनधिकृतपणे सुरू असलेल्या बांधकामाला स्थगिती द्यावी,

पाणीपुरवठा (Water supply) योजनेबाबत सुधारीत नियम आदी विविध विषयांवर चर्चा करून ठराव संमत करण्यात आला. विविध शासकीय योजनांबाबत ग्रामविकास अधिकारी के. के. पवार यांनी माहिती दिली. यावेळी तलाठी किरण भोये यांनी ही मतदार नोंदणीविषयी (Voter registration) माहिती दिली. यावेळी माजी जि.प.सदस्य शंकरराव काठे, शंकरराव वाघ, गणेश तिडके,भारत काठे,

सुभाष नेहेरे,समुदाय आरोग्य अधिकारी डॉ विवेक गुरव, आरोग्य सेवक सुरेश भवर, कृषी अधिकारी मनिषा पाटील, जि.प.शाळेचे मुख्याध्यापक, सर्व अंगणवाडी सेविका , वीज वितरण कंपनीचे कर्मचारी तसेच दत्तात्रय कोरडे, सोमनाथ वतार, भगिरथ घुमरे, कृष्णा लहांगे, गोरख जाधव, रविंद्र बदादे, आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आभार तलाठी किरण भोये यांनी मानले.

करोनापासुन बचाव करण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय असल्याने ग्रामस्थांनी स्वतः पुढे येवून लसीकरण घेतली आहे अजुनही काही नागरिक राहिले असून त्यांनीही लसीकरण करून घ्यावे जेणेकरून आपले व गावचे आरोग्य सुरक्षित राहील याची काळजी घ्यावी.

के.के. पवार, ग्रामविकास अधिकारी, जानोजी

करोना प्रतिबंधक लस ही प्रत्येक नागरिकाने घेणे आवश्यक आहे. आपल्यामुळे आपल्या सह कुटुंब व इतरांचे जीव धोक्यात घालण्यापेक्षा प्रत्येकाने आपापले लसीकरण करणे आवश्यक आहे परंतु काही याकडे दुर्लक्ष करत आहेत. जानोरी ग्रामसभेत यामुळे ग्रामस्थांनी दाखले न देण्याचा ठराव संमत केला असून वंचितांनी त्वरीत लसीकरण करून घ्यावे.

शंकरराव काठे, माजी सदस्य जि. प.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com