नाशिक तालुक्यात १९ उपकेंद्रत लसीकरण सुरू

नाशिक तालुक्यात १९ उपकेंद्रत  लसीकरण सुरू

देवळाली कॅम्प। deolali

करोना च्या पार्श्वभूमीवर साशनाने सर्वत्र लसीकरण सुरू केले आहे,नाशिक तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १९ उपआरोग्य केंद्राच्या माध्यमातून सुरू झालेल्या या मोहिमेस मोठा प्रतिसाद मिळत आहे.

पंचायत समितीच्या आरोग्य विभागाचे वतीने कोविड 19 चे लसीकरण संपूर्ण तालुक्यातील गावा गावात सुरू केले आहे, वय वर्षे 45 वरील कोणतीही व्यक्तीला ही लस दिली जात असून सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत हा उपक्रम सुरू ठेवले जात आहे, आधार कार्ड किंवा पॅन काड ओळखपत्र म्हणून गरजेचे आहे. लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर ४५; दिवसांनी दुसरा डोस घ्यावायाचा आहे,

काल बेलदगाव येथे सरपंच मोहनिश दोंदे यांचे हस्ते या लसीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपसरपंच पुष्पा धुरजड, आकाश पागेरे, सुरेखा पाळदे, कांचन घोडे, सिंधुताई पवार, अतुल पाळदे, ताराचंद पाळदे, निकिता पाळदे, डॉ. नितिन पवार, डॉ.गवरी निसाळ, डॉ. बविस्कार, डॉ. विसपुते सह इतर अधिकारी उपस्थित होते.

याशिवाय तालुक्यातील जातेगाव, विल्होळी, महिरावणी, गणेशगाव (ना), तळेगाव (अ), सैय्यद पिंपरी, विंचूरगवळी माडसंगवी, शिंदे, पळसे,जाखोरी, ओझरखेड, गिरणारे, गोवर्धन, दरी, लहवीत, संसारी, राहुरी (दोनवडे), शिगवेबहुला या ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

नागरिकांनी वरील पैकी आपल्या सोयीनुसार कोणत्याही ठिकाणी‌ जाऊन लस घेऊ शकतात. यासाठी सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत रजिस्ट्रेशन करून घेतल्यास गैरसोय होणार नाही. प्रत्येक केंद्रावर दररोज १०० व्यक्तिनां लसीकरणाची सोय केलेली आहे. प्रत्येक उपकेन्द्र अंतर्गत 3 गावांचा समावेश आहे.

नागरिक व प्रशासन यांचे सोयी नुसार तिन्ही गावात लसीकरण केले जाऊ शकते,याचा लाभ घेण्याचे आवाहन पंचायत समिति सभापती विजया काडेकर, उपसभापति नितिन जगताप, प.स.सदस्य रत्नाकर चुभले, डॉ मंगेश सोनवणे व इतरांनी केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com