तळेगाव दिंडोरी । Dindori

दिंडोरी तालुक्यातील तळेगाव दिंडोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सोमवार पासून कोव्हिड-19 लसीकरण मोहिम तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजित कोशिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. भारती चव्हाण यांच्या नियोजनानुसार सुरु करण्यात आली.

या ठिकाणी पहिल्या दिवशी सोमवारी 21 तर दुसर्या दिवशी बुधवारी 109, व तिसर्या दिवशी शुक्रवारी 112 अशा एकूण 242 नागरिकांनी कोव्हिड-19 लस घेतली.

तळेगांव दिंडोरी प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येक सोमवार, बुधवार व शुक्रवारी ही लस देण्यात येणार आहे. 60 वर्षांवरील व्यक्ती तसेच 45 ते 59 वयोगटातील बी.पी, शुगर व इतर आजारांनी ग्रस्त व्यक्तींना लस घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या लसीकरण मोहिमेसाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. भारती चव्हाण यांच्यासह आरोग्य केंद्रातील सर्व सेवक व कर्मचारी विशेष परिश्रम घेत आहे.