नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात लसीकरण सुरू

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात लसीकरण सुरू

नाशिकरोड । प्रतिनिधी

नाशिक महापालिका, बिटको रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या मदतीने नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात बंदी आणि कर्मचारी यांना कोविड लसीकरण सुरु झाले आहे. कारागृह अधिक्षक प्रमोद वाघ, वरिष्ठ कारागृह निरीक्षक अशोक कारकर, कारागृहाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन कुमावत, डॉ. निळकंठ ससाणे, बिटको रुग्णालयाचे डॉ. जितेंद्र धनेश्वर आदी ही मोहिम राबवत आहेत.

राज्यातील जेलमध्ये करोनाचा संसर्ग झाला आहे. नाशिकरोड जेलने त्याला रोखले आहे. कारागृहाने आता सर्व अडीच हजार बंदी तसेच चारशे कर्मचारी यांना कोविड लस देण्याचा संकल्प सोडला आहे. गेल्या पंधरा दिवसांत 1400 बंद्यांना लस देऊन कारागृहाने राज्यात अव्वल क्रमांक मिळवला आहे. मुंबई, पुणे, ठाणे कारागृहातही लसीकरण सुरु झाले आहे. मात्र, सर्वात जास्त लसीकरण नाशिकरोड कारागृहात झाले आहे.

नाशिकरोड कारागृहात अडीच हजार बंदी आहेत. त्यात शिक्षा सुनावलेले पक्के आणि खटला सुरु असलेले कच्चे कैदी यांचा समावेश आहे. महिला 80 बंदी असून त्या सर्वांना लस देण्यात आली आहे. त्याचबरोबर कारागृहात चारशे अधिकारी व कर्मचारी असून तीनशे कर्मचार्‍यांनी लस घेतली आहे. बंद्याची संख्या जास्त आहे. तसेच लशीचे दिवसाला दीडशे ते दोनशे डोस येतात. त्यामुळे दीड महिन्यात लसीकरण पूर्ण होईल.

के. एन. केला शाळेत पुन्हा जेल सुरु केले आहे. नवीन बंद्यांना तेथे ठेऊन करोना चाचणी घेतली जाते. त्यांना पंधरा दिवसांनी मुख्य कारागृहात आणले जाते. कठोर उपायांमुळे नाशिकरोड कारागृहात करोनाचा शिरकाव रोखण्यास कारागृह प्रशासनाला यश आले आहे. बंदी-नातेवाईक मुलाखत, त्यांची गळाभेट उपक्रम, बंदी-वकील भेट, सत्संग व इतर उपक्रम बंद आहेत. बंद्यांना कोर्टात न नेता व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे कोर्टापुढे सादर केले जाते. बंद्यांसह कर्मचार्‍यांची रोज तपासणी होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com