जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढला

आज ६ हजार ७१३ नागरिकांनी घेतली लस
जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढला

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यात ( Nashik District ) दिवसभरात पहिला आणि दुसरा डोस दोन्ही मिळून जवळपास ६ हजार ७१३ जणांना करोना प्रतिबंधक लसीचे ( Corona Vaccination) डोस देण्यात आले. यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात एकुण १४ लाख ३६ हजार २३४ नागरीकांना लस देण्यात आली आहे.

जिल्ह्यात लसीकरण सुरू झाल्यापासून करोना प्रतिबंधक लसीच्या तुटवड्याचा सामना करत अडखळत लसीकरण सुरू आहे. शहर तसेच जिल्ह्यात लसींची मागणी वाढली आहे. पंरतु त्या तुलनेत लस उपलब्ध होत नसल्याने लसींचा तुटवडा जाणवत होता. पंरतु गेल्या दोन दिवसात जिल्ह्याला ४३ हजार लसी उपलब्ध झाल्याने या आठवड्यात लसीकरणाचा वेग वाढल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

16 जानेवारी 2021 पासून संपुर्ण देशासह जिल्ह्यात कोविड प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली. मात्र गेली दिड महिनाभरापासून लसींचा तुटवडा असल्याने 300 पैकी निम्मे लसीकरण केंद्र बंद होते.

आज दिवसभरात नाशिक महापालिकेच्या ५ तर जिल्हाभरातील २५ व मालेगाव ६ अशा एकुण ३६ केंद्रांवर लसीकरण सुरू होते.

यामुळे आज दिवसभरात जिल्ह्यात ४ हजार २४३ जणांना पहिला डोस देण्यात आला. यामध्ये नाशिक पालिका हद्दीत १ हजार २१२ , ग्रामिण जिल्ह्यात २ हजार ७०६ , मालेगाव ३२७ असे लसीकरण झाले आहे. तर २ हजार ४७० जणांना दुसरा डोस देण्यात आला. यामध्ये नाशिक पालिका हद्दीत ५४५, ग्रामिण जिल्ह्यात १ हजार ६७३, मालेगाव २५२ असे लसीकरण झाले आहे.

रविवारी महापालिका हद्दीत कुठेही लसीकरण होणार नसल्याचे महापालिकेच्या वतीने कळविण्यात आलेले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com