नाशिक जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढला

नाशिक जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढला

नाशिक। प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी पाच ते दहा हजार होणारे लसीकरण( Corona Vaccination ) बुधवारी अचानक वाढले असून जिल्हाभरात काल 138 केंद्रांवर दोन्ही मिळून 25 हजार 947 जणांना करोना प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले. यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात एकुण 13 लाख 11 हजार 300 नागरीकांना लस देण्यात आली आहे.

जिल्ह्यात लसीकरण सुरू झाल्यापासून कोरोना प्रतिबंधक लसीच्या तुटवड्याचा सामना करत अडखळत लसीकरण सुरू आहे. शहर तसेच जिल्ह्यात लसींची मागणी वाढली आहे. पंरतु त्या तुलनेत लस उपलब्ध होत नसल्याने लसींचा तुटवडा जाणवत होता. आतापर्यंत आठडाभरात सरासरी 13 ते 15 हजार लसी जिल्ह्यासाठी उपलब्ध होत होत्या तर दररोज सरासरी पाच ते दहा हजार जणांचेच लसीकरण होत होते. पंरतु रविवारी जिल्ह्याला 75 हजार लसी उपलब्ध झाल्याने आज लसीकरणाचा वेग वाढल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

16 जानेवारी 2021 पासून संपुर्ण देशासह जिल्ह्यात कोविड प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली. मात्र गेली दिड महिनाभरापासून लसींचा तुटवडा असल्याने 250 पैकी निम्मे लसीकरण केंद्र बंद होते. आज दिवसभरात नाशिक महापालिकेच्या 39 तर जिल्हाभरातील 91 व मालेगाव 8 अशा एकुण 138 केंद्रांवर लसीकरण सुरू होते.

यामुळे काल दिवसभरात जिल्ह्यात 17 हजार 661 जणांना पहिला डोस देण्यात आला. यामध्ये नाशिक पालिका हद्दीत 4 हजार 598 ग्रामिण जिल्ह्यात 11 हजार 877, मालेगाव 1 हजार 186 असे लसीकरण झाले आहे. तर 8 हजार 286 जणांना दुसरा डोस देण्यात आला. यामध्ये 18 ते 44 वयोगटातील 14 हजार 2 जणांना डोस देण्यात आले आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com