Photo Gallery : आदिवासी पाड्यांमधील लसीकरणाचा टक्का वाढला

सामाजिक संस्थांकडून होतेय जनजागृती
Photo Gallery : आदिवासी पाड्यांमधील लसीकरणाचा टक्का वाढला

प्रतिनिधी । नाशिक

शहरात पसरणारे महामारीचे सावट पहाता आदिवासी गावांमध्ये या महामारी ने घरे उध्वस्त व्हायला हलकीशी सुरुवात झालेली आहे. ह्या आजाराची झळ ग्रामीण भागामध्ये तीव्र होऊ नये, महामारी पासून गावचे संरक्षण होण्यासाठी आदिवासी ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात लसीकरण होणे गरजेचे आहे...

आदिवासी भागातलसीकरणा विषयी अतिशय भीती अंधश्रद्धा व गैरसमज पसरलेले आहेत या पार्श्वभूमीवर मानव अधिकार संवर्धन संघटन संस्थेने मागील १५ दिवसांपासून पेठ येथील कायरे, सावरणा झरी, बोरीची बारी कुंभाळे या गावात जनजागृती व प्रत्यक्ष लसीकरण कार्यक्रम हाती घेतला आहे.

या कार्यक्रमातील पहिला टप्पा म्हणून सुरुवातीला गावामध्ये जाऊन तेथील ग्रामस्थांशी संवाद साधण्यात आला. लसीकरणा विषयी भीती गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला.या नंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रत्यक्ष लसीकरण हाती घेत मानव अधिकार संवर्धन संघटन संस्थेतर्फे प्राथमिक आरोग्य केंद्र कुंभाळे यांच्या मदतीने काम सुरू केले गेले.

कायरे, पेठ येथील मंदिरामध्ये प्रत्यक्ष लसीकरण मोहीम राबविण्यात आली. यामध्ये गावातील लसीकरणला तीव्र विरोध असलेल्या लोकांचे समुपदेशन करून त्यांना लस घेण्यासाठी प्रवृत्त केले गेले. सुरुवातीला मिश्र प्रतिसाद आल्याने ४५ वयावरील २२ ग्रामस्थांचे लसीकरण केले गेले.

यात २१ मे रोजी झालेल्या पहिल्या लसीकरण मोहिमेमध्ये २४ लोकांचे लसीकरण झाले. गावातील लोकसंख्येच्या प्रमाणात अजून साधारण १४५ नागरिक ४५ वर्षांच्या पुढचे लस घेणाऱ्यांच्या यादीत आहेत, या पैकी ४६ लोकांचे संस्थेच्या प्रयत्नांनी लसीकरण करण्यात आले. या पूर्वी गावामध्ये अंगणवाडी सेविका, आशाताई आणि अन्य फ्रंटलाईन वर्कर यांचे लसीकरण करण्यात आले आहे.

गावातील या मोहिमेसाठी नाशिक शहरातून मानव अधिकार संवर्धन संघटन संस्थेच्या कोव्हीड मदत कार्यात "मास फॉर मासेस" या प्रकल्पात सक्रिय तरुण कार्यकर्ते सहभागी झाले. हा प्रकल्प गेल्या २ महिन्यापासून नाशिकच्या कोव्हीड मदतकार्यात सक्रिय आहे.

याच प्रकल्पाचा पुढचा टप्पा म्हणून संस्थेतर्फे ग्रामीण भागात लसीकरण आणि जनजागृती करण्याची सुरुवात केली. कायरे गावातील लसीकरणास मिळालेला सक्रिय प्रतिसाद पहाता येत्या आठवड्यात सावरना, झरी, बेहेडपाडा, कुंभाळे , गोळसपाडा , यापाड्यावर देखील मोहीम नियोजित करण्यात आली आहे. यासाठी मिळालेला स्थानिक यंत्रणांचा प्रतिसाद आणि सहकार्य उल्लेखनीय असून तालुका आरोग्य अधिकारी डॉ. योगेश मोरे, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र कुंभाला डॉ. चारुडे यांचे विशेष सहकार्य लाभले.

डॉ.मोरे यांनी स्वतः स्थानिक आरोग्य केंद्रातील डॉ. योगीराज भोये आणि ग्रामपंचायत सभापती विलास अलबाड यांच्या सह लसीकरण केंद्रास भेट देऊन लसीकरण करण्यास ग्रामस्थांना प्रोत्साहित केले. यांच्यासह मुख्य सिस्टर रेखा दलाल, गावातील आशाताई निर्मला भुसारे, सिस्टर कविता पवार , भोये सिस्टर , लॅब टेक्निशियन श्री जाधव, आरोग्य सेवक बागुल यांचा या लसीकरण मोहिमेत सहभागी होता.

संस्थेकडून श्यामला चव्हाण, डॉ. मिलिंद वाघ, मुक्ता कावळे, प्रणित पवार, तल्हा शेख, निखिल भुजबळ, सई कावळे यांनी काम पाहिले. गावातील लोकांशी संवाद साधण्यासाठी मुकुंद दीक्षित आणि वासंती दीक्षित उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com