जिल्ह्यात ८ लाख ५७ हजार २१५ जणांचे लसीकरण

जिल्ह्यात ८ लाख ५७ हजार २१५ जणांचे लसीकरण

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्यात लसीकरणाची मोहीम आता जोर धरू लागली आहे. आतापर्यंत नाशिक जिल्ह्यात एकूण 6 लाख 62 हजार 101 जणांनी पहिला डोस घेतला असून 1 लाख 95 हजार 114 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 8 लाख 57 हजार 215 जणांनी डोस घेतल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

नाशिक जिल्ह्यातील 1 लाख 28 हजार 811 आरोग्य व इतर कर्मचार्‍यांनी पहिला डोस घेतला आहे. तर दोन लाख 77 हजार दोन जणांनी 45 ते 60 वयोगटातील लाभार्थी पहिला डोस घेतला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 60 वर्ष वयोगट पुढील दोन लाख 41 हजार 875 जणांनी डोस घेतला असून 18 ते 44 वयोगटातील 14 हजार 313 जणांनी पहिला डोस घेतला आहे. आरोग्य व इतर कर्मचारी दुसरा डोस 59 हजार 825, 45 ते 60 वयोगटातील लाभार्थींनी 60 हजार 780 तर 60 वर्षे वयोगटातील पुढील लाभार्थी 74 हजार 386 त्याचप्रमाणे 18 ते 44 वर्ष वयोगटातील एकूण 123 जणांनी दुसरा डोस घेतला आहे.

नाशिक जिल्ह्यातील बागलाण, चांदवड, देवळा, दिंडोरी, इगतपुरी, कळवण, मालेगाव, नांदगाव, नाशिक, निफाड, सिन्नर, सुरगाणा, त्र्यंबकेश्वरसह सर्व तालुक्यांमध्ये लसीकरण सुरू आहे. लोक शासकीय पद्धतीनुसार नोंदणी करून लसीकरण घेत आहे. आज रविवार असल्यामुळे लसीकरण केंद्र बंद होते. याबाबत आवाहन प्रशासनातर्फे पूर्वीच करण्यात आले होते म्हणून लोकांची गैरसोय झाली नाही. दरम्यान उद्या सोमवारपासून पुन्हा लसीकरण मोहीम संपूर्ण जिल्ह्यात सुरू राहणार आहे.

आणखी जनजागृतीची गरज

लोकांमध्ये अजूनही पाहिजेत अशी जनजागृती झालेली दिसत नाही. जुने नाशिकसह शहरातील काही भागातील लोक अद्याप लस घेण्यासाठी पुढे येत नसल्याचे चित्र मागील काही दिवसांपासून दिसत आहे. शासनाने तसेच प्रशासनाने याबाबत गंभीर विचार करून लोकांचे लसीकरण करून घेण्याबाबत काही व्यापक उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com