जिल्ह्यात 8 लाख 13 हजार जणांचे लसीकरण

जिल्ह्यात 8 लाख 13 हजार जणांचे लसीकरण

काल दिवसभरात वाढ 216 केंद्रावर 16 हजार जणांना लस

नाशिक। प्रतिनिधी

नाशिक शहरासह जिल्हाभरात करोना प्रतिबंधक लसीच्या तुटवड्याचा सामना करत अडखळत लसीकरण सुरू आहे. रविवारी उपलब्ध झालेल्या 16 हजार लसीच्या साठ्यामुळे काल दिवसभरात 16 हजार 192 जणांना दोन्ही डोस देण्यात आले. यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात एकुण 8 लाख 12 हजार 845 जणांना लस देण्यात आली. दरम्यान, जिल्ह्यात शिल्लक असलेले तसेच नव्याने मिळालेले 1 हजार 800 कोव्हॅक्सीन हे केवळ 45 वर्षांवरील दुसरा डोस बाकी असणार्‍यांंना देण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगीतले.

करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर तसेच 18 ते 44 वयोगटालाही लस सुरू केल्याने लसींची मागणी वाढली आहे. पंरतु त्या तुलनेत लस उपलब्ध होत नसल्याने लसींचा तुटवडा जाणवत आहे. शहर तसेच जिल्ह्यात आतापर्यंत 8 लाख 12 हजार 845 लसींचे दोन्ही मिळून डोस देण्यात आले आहेत. जिल्ह्यात लसींचा अपुरा साठा असल्याने पुन्हा एकदा लसीकरणावर याचा परिणाम होत आहे. दरम्यान, रविवारी उपलब्ध झालेल्या 16 हजार लसींच्या साठ्यामुळे मंगळवारी दिवसभरात दोन्ही मिळून 16 हजार 192 जणांना लस देण्यात आली आहे.

करोनाचा संसर्ग होऊ नये याकरिता 16 जानेवारी 2021 पासून संपुर्ण देशासह जिल्ह्यात कोविड प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली. मात्र आठ दिवसांपासून लसींचा तुटवडा असल्याने अनेक लसीकरण केंद्र बंद होती. नाशिक महापालिकेच्या 21 तर जिल्हाभरातील 105 अशा एकुण 126 केंद्रांवर लसीकरण सुरू होते. तर रविवारी 1 हजार 800 कोव्हॅक्सीन लस उपलब्ध झाली असून ती केवळ 45 वयोगटासाठी व केवळ दुसरा डोस देण्यासाठीच देण्याचे राज्य शासनाचे निर्देश असून उद्यापासून हे लसीकरण सुरू आहे.

काल दिवसभरात जिल्ह्यात 7 हजार 702 जणांना पहिला डोस देण्यात आला. यामध्ये नाशिक पालिका हद्दीत 1 हजार 847, ग्रामिण जिल्ह्यात 5 हजार 265, मालेगाव 590 असे लसीकरण झाले आहे. तर 8 हजार 490 जणांना दुसरा डोस देण्यात आला. 18 ते 44 वयोगटांतील 2 हजार 229 जणांना लस देण्यात आली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com