जिल्ह्यात अठरा वर्षांपुढील ५९८ नागरिकांचे लसीकरण

जिल्हाधिकारी मांढरे : ५ केंद्रांवर लसीकरण
जिल्ह्यात अठरा वर्षांपुढील ५९८ नागरिकांचे लसीकरण

नाशिक । Nashik

महाराष्ट्र दिनापासून जिल्ह्यातील पाच लसीकरण केंद्रांवर वयवर्ष १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले असून दोन दिवसात ५९८ नागरीकांनी लस घेतली. लसींचा साठा उपलब्ध असेल तोपर्यंत हे लसीकरण ७ दिवस सुरू राहील, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.

जिल्ह्यातील नाशिक महानगरपालिका क्षेत्रात दोन, ग्रामीण क्षेत्रात दोन तर मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात एक केंद्र सुरू करण्यात आले आहेत. प्रत्येक लसीकरण केंद्राला दोन हजार प्रमाणे दहा हजार लस स्वतंत्रपणे जिल्ह्यात उपलब्ध करून दिलेल्या आहेत. पुढील ७ दिवस लस संपेपर्यंत लसीकरण चालू ठेवण्यात येणार आहेत.

महानगरपालिका कार्यक्षेत्रात इंदिरा गांधी रूग्णालय, पंचवटी कारंजा व नाशिक रोड नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, नाशिक ग्रामीण क्षेत्रात मोहाडी प्राथमिक आरोग्य केंद्र (दिंडोरी) व पिंपळगाव बसवंत प्राथमिक आरोग्य केंद्र, निफाड तर मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातील शहरी आरोग्य केंद्र निमा येथे ही लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली आहे.

पहिल्या दिवशी २७६ नागरिकांनी लसीकरण केले असून त्यात नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रात इंदिरा गांधी रूग्णालयात ९०, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, नाशिक रोड येथे ९५ तर नाशिक ग्रामीण भागात मोहाडी प्राथमिक आरोग्य केंद्र(दिंडोरी) येथे २८ पिंपळगाव बसवंत प्राथमिक आरोग्य केंद्र (निफाड) येथे ४९ इतके तर मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातील शहरी आरोग्य केंद्र निमा येथे १४ इतके असे जिल्ह्यातील एकूण २७६ नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

दुसऱ्या दिवशी ३२२ नागरिकांनी लसीकरण केले. इंदिरा गांधी रूग्णालयात ८७, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, नाशिक रोड ७‍१, तर नाशिक ग्रामीण भागात मोहाडी प्राथमिक आरोग्य केंद्र(दिंडोरी) येथे ८४, पिंपळगाव बसवंत प्राथमिक आरोग्य केंद्र (निफाड) येथे ८० इतके लसीकरण झाले आहे. यानुसार जिल्ह्यातील लसीकरण केंद्रावर एकूण ३२२ नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com