शिक्षणासाठी विदेशात जाणाऱ्या शंभर विद्यार्थ्यांचे लसीकरण

जिल्हाधिकारी मांढरे : १ जूनला प्रारंभ
शिक्षणासाठी विदेशात जाणाऱ्या शंभर विद्यार्थ्यांचे लसीकरण

नाशिक । Nashik

भारतातून परदेशात जाणाऱ्या नागरिकांना लसीकरण करून घेणे अनिवार्य करण्यात आले असून या परिस्थितीत ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचे आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण येत्या १ जूनपासून विशेष बाब म्हणून जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.

लसीकरण मोहिमेचे घटना व्यवस्थापक तथा उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ यांनी जारी केलेल्या पत्रकानूसार महाकवी कालीदास कलामंदिर येथे मंगळवारी (दि.१) दुपारी १२ वाजेपासुन होणाऱ्या या लसीकरणासाठी विद्यार्थ्यांनी । - 20 किंवा DS- 160 फॉर्म , ॲडमिशन निश्चित झाल्याचे पत्र, आयकार्ड आणि पासपोर्ट परवाना सोबत आणावे व लसीकरण मोहिमेत सहभागी व्हावे.

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात आवाहन केले होते. पुणे व मुंबई महानगरपालिका क्षेत्रात त्या पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर नाशिक जिल्ह्यातील परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

परदेशातील नामवंत विद्यापीठात शिक्षणासाठी जाणे ही विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अतिशय महत्वाची बाब असून केवळ लसीकरणाच्या अभावी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून या विशेष लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे, असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.

शंभर विद्यार्थ्यांना देण्यात येणार ‘कोविडशिल्ड’ लसपरेदशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या नाशिकमध्ये अंदाजे शंभर पर्यंत आहे. अमेरिका युरोप व इतर बहुसंख्य देशांमध्ये ‘कोविडशिल्ड’ ही लस मान्यताप्राप्त असल्यामुळे या विद्यार्थ्यांना कोविडशिल्ड लस देण्यात येणार आहे. लसीकरणाकरिता आवश्यक असणारी लस नाशिक महानगरपालिकेला जिल्हा लस भांडार येथुन उपलब्ध करुन देण्यात येणार अाहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com