कळवणला लसीकरणाचा वेग वाढला

20 हजार लसीकरणाचा टप्पा पूर्ण
कळवणला लसीकरणाचा वेग वाढला

पुनदखोरे। वार्ताहर

संभाव्य करोनाच्या corona तिसर्‍या लाटेचा धोका लक्षात घेता शासन लसिकरणाचा वेग वाढविण्यासाठी आग्रही असताना काही ठिकाणी लसींची अनुपलब्धता व लाभार्थ्यांकडुन ओरड होत आहे. कळवण उपजिल्हा रुग्णालय kalwan sub district hospital मात्र याबाबतीत अपवाद ठरत असून लसीकरणाचा 20000 चा टप्पा ओलांडला आहे.

कळवण स्थित उपजिल्हा रुग्णालय शंभर खाटांचे असून ,सध्याचा काळ हा कोविड वर केंद्रित आहे. असे असताना रुग्णालयाने नावलौकीकाला साजेसे काम करत बाह्यरुग्ण सेवा, आपत्कालीन सेवेसोबतच प्रसूती, सिझेरियन शस्त्रक्रिया, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, मोतीबिंदू, हर्निया, यासारख्या इतर शस्त्रक्रिया सुरू ठेवून रुग्णांना दिलासा देण्याचे काम केले आहे.

कळवण उपजिल्हा रुग्णालयात सन 2021- 22 या वर्षात सामान्य प्रसुती, सिझेरियन प्रसुती, कुंटूब नियोजन शस्त्रक्रीया , मोठया शस्त्रक्रीयामध्ये अपेनडीक्स, हर्निया, हायड्रोसिल यासारख्या मोठ्या प्रमाणावर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहे. त्याचप्रमाणे करोना लसिकरणाचे दररोज 100 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट असताना दैनंदिन कामकाजासोबत येथील लसीकरण केंद्रावर दररोज 150 ते 300 लाभार्थ्यांना लसीचे डोस दिले जात आहे.

कळवण उपजिल्हा रुग्णालयाने यशस्वीरीत्या 20000 लसींचा टप्पा पार केला आहे. आज कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे मेगाशिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी सुमारे 50 शस्त्रक्रिया पार पडल्याची माहीती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

शिबिर यशस्वीतेसाठी प्रसूतिरोग तज्ज्ञ डॉ. निलेश लाड, भुलतज्ञ डॉ. सरिता वाघ, डॉ प्रल्हाद चव्हाण, सोनालॉजिस्ट डॉ. पराग पगार, परिसेविका तारा जाधव, डॉ. मनोज सूर्यवंशी, डॉ. अमोल चौरे, डॉ. वैशाली चौधरी, अधिपरिचरिका पंचाक्षरी, सावंत, रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी उदय बस्ते, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी राजेंद्र अहिरे, पवार, प्रकाश आहेर, कपिल शिरसाठ, नाठे, स्नेहल जाचक, पुष्पा वाघ, आहारतज्ज्ञ वंदना खैरनार, समुपदेशक शरद चव्हाण, आरोग्यमित्र काकुळते यांच्यासह विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी, कक्षसेवक प्रयत्नशील आहे. सेवेचा अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

कळवण शहरातील सर्व नागरिक, राजकीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह माझ्यासाठी सुद्धा 20000 लाभार्थ्यांचे लसीकरण करवून घेणे हा अभिमानाची गोष्ट आहे.

डॉ. अंनत पवार, वैद्यकीय अधिक्षक, कळवण

वरिष्ठांच्या मार्गदर्शनात अधिपरीचारक कुणाल कोठावदे यांनी सुरू केलेल्या कामकाजासाठी तालुक्यातील नागरिकांचा प्रतिसाद मिळाला.सुस्मिता अवेरे, विकास थोरात आदी सहकार्‍यांच्या मदतीचे हे यश आहे.

योगेश पवार, लसीकरण केंद्र संयोजक

Related Stories

No stories found.