नाशिक शहरात 'इतक्या' मुलांना टोचला पहिला डोस

नाशिक शहरात 'इतक्या' मुलांना टोचला पहिला डोस

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिशहरासह जिल्ह्यात १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण (Vaccination campaign in nashik) सुरु झाले आहे. सकाळपासून लसीकरणासाठी मुलांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आज सकाळी नाशिक शहरातील ६ तर जिल्ह्यातील २५ लसीकरण केंद्रांवर लस टोचण्यात आली. येवल्यात एक मुलगा चुकून ज्येष्ठांच्या रांगेत उभा राहिल्याने त्यास कोविशिल्ड (covishield) लस टोचली गेल्याचा प्रकार घडला याव्यतिरिक्त सर्वत्र लसीकरण शांततेत पार पडले....

नाशिक शहरातील सहा लसीकरण (Six vaccination centers in nashik) केंद्रांवर १ हजार ३२५ मुलामुलींना लस टोचण्यात आली. यामध्ये मेरी कोविड केअर (Meri CCC) सेंटरमध्ये ३६५ मुलांचे लसीकरण झाले असून २४३ मुलांचे तर १२२ मुलींचे लसीकरण झाले. समाज कल्याण (Samaj Kalyan) येथे १२५ मुलांचे लसीकरण झाले असून ७२ मुलांना तर ५३ मुलींना लस टोचण्यात आली.

सिडको शहर प्राथमिक आरोग्य (Cideco cphc) केंद्रात १३० मुलांचे लसीकरण झाले असू ७४ मुलांचा तर ५६ मुलींचा यात समावेश आहे. डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात (Dr Zakir Hussain hospital nashik) ९१ मुलांचे लसीकरण करण्यात आले. तर ५९ मुलींना लस टोचण्यात आली आहे.

सातपूर येथील ESIS हॉस्पिटल येथे २९४ मुलांचे लसीकरण झाले असून यात १९१ मुलांचा तर १०३ मुलींचा समावेश आहे. तसेच नाशिकरोड येथील न्यू बिटको हॉस्पिटलमध्ये २६१ मुलांचे लसीकरण झाले असून यात १६२ मुले तर ९९ मुलींचा समावेश आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com