करोनावर मात करण्यासाठी लसीकरण महत्वाचे : जिल्हाधिकारी

करोनावर मात करण्यासाठी लसीकरण महत्वाचे : जिल्हाधिकारी

नाशिक । Nashik

सध्याच्या घडीला लसीकरण महत्वाचे असून याच गोष्टीवर भर देणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी देशदूतशी बोलताना सांगितले.

एका इंग्रजी दैनिकाने दिलेल्या बातमीत लसीकरणा साठी लॉक डाऊन काळात बाहेर पडता येणार नाही असे मी म्हंटले असल्याचे वृत्त चुकिचे असून असे कोणतेही आदेश दिले नसून लसीकरणाला माझा पूर्ण पाठींबा असल्याचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सांगितले.

जिल्ह्यात करोनाचा कहर वाढत असून याला आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना करण्यावर आम्ही भर देत आहोत. महत्वाचे म्हणजे जिल्ह्यात लसीकरण मोठ्या प्रमाणावर होण गरजेचे आहे. आणि त्याच दृष्टीने आम्ही पाउल टाकत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यातील मृत्युदर कसा कमी होईल यासाठी उपाययोजना करण्यावर भर दिला जात आहे.

काही देशांनी मोठ्या प्रमाणात लसीकरण करून करोनावर नियंत्रण केले आहे. त्यामुळे आपल्याला देखील लसीकरणावर भर द्यावयाचा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करावे असे आवाहन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com