उद्या फक्त दुस-या डोससाठीच लसीकरण

उद्या फक्त दुस-या डोससाठीच लसीकरण

नाशिक | प्रतिनिधी Nashik

शहरात उद्या होणारे लसीकरण ( Corona Vaccination ) हे फक्त दुस-या डोससाठीच ( Only Second Dose Of Vaccination )असणार असल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

शहरातील ३२ केंद्रांवर हे लसीकरण होत असून यासाठी ४ हजार ४८० लस प्राप्त झाल्या आहेत. प्रत्येक केंद्रावर १४० डोस देण्यात आले असून नागरिकांनी गर्दी न करण्याचे आवाहन देखिल महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

उद्या (दि. १९ ) शहरातील ३२ शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी लसीकरण केंद्र चालू असणार आहे. तसेच नाशिक शहरातील ज्या नागरिकांचा कोविशील्ड या लसीचा दुसरा डोस बाकी असेल त्यांचेच लसीकरण शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रावर होणार आहे.

शहरातील नागरिकांनी इतर कोणत्याही लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये, असे आवाहन नाशिक महानगरपालिकेच्या वतीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com