१५ ते १८ वयोगटाचे लसीकरण : दिंडोरीत ‘या’ केंद्रांवर मिळणार डोस

१५ ते १८ वयोगटाचे लसीकरण : दिंडोरीत ‘या’ केंद्रांवर मिळणार डोस

ओझे | वार्ताहर | Oze

शासनाच्या वतीने 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी लसीकरणास (Vaccination) उद्यापासून (दि. ०३) सुरुवात होणार आहेत. दिंडोरी तालुक्यात (Dindori Taluka) तीन ठिकाणी लसीकरण केंद्र (Vaccination Center) असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष मांडगे (Dr. Subhash Mandge) यांनी दिली.

१५ ते १८ वयोगटाचे लसीकरण : दिंडोरीत ‘या’ केंद्रांवर मिळणार डोस
नाशकात विवाहितेची आत्महत्या

दिंडोरी तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगांव दिंडोरी, ग्रामीण रुग्णालय दिंडोरी, व ग्रामीण रुग्णालय वणी या ठिकाणी लसीकरण होणार आहे. यासाठी ऑनलाईन नोंदणी (कोविन अँपवर) करता येणार आहे.

१५ ते १८ वयोगटाचे लसीकरण : दिंडोरीत ‘या’ केंद्रांवर मिळणार डोस
पाचवीतील विद्यार्थिनीची गळफास घेत आत्महत्या

तसेच प्रत्यक्ष लसीकरण केंद्रावर जाऊनदेखील नोंदणी करता येईल. यासाठी विद्यार्थ्यांना आपले आधारकार्ड (Aadhar Card) आवश्यक आहे. ज्यांचे आधारकार्ड नसेल त्याना शाळेचे ओळखपत्र, बोनाफाईड, शाळा सोडल्याचा दाखलादेखील चालणार आहे, अशी माहिती डॉ. सुभाष मांडगे यांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com