सिरीजअभावी लसीकरण विस्कळीत

सिरीजअभावी लसीकरण विस्कळीत

मनमाड । प्रतिनिधी Manmad

इंजेक्शनसाठी वापरली जाणारी सिरीजचा (Injection series) साठाच संपुष्टात आल्यामुळे शहरातील करोना प्रतिबंधक लसीकरण (Corona preventive vaccination) थांबविण्याची वेळ आरोग्य यंत्रणेवर (Health systems) आली आहे. लसीचा साठा (Vaccine stocks) मुबलक प्रमाणात उपलब्ध असतांना आता सिरीजच संपल्यामुळे लसीकरण (Vaccination) थांबवावे लागले असून करोना तपासणीचे स्वॅब (Corona check swab) घेणे देखील बंद करण्यात आल्याने शहरवासिय आरोग्य यंत्रणेचे या गोंधळामुळे हैराण झाले आहेत.

दरम्यान, शासनाच्या आदेशामुळे डीसीएचसी सेंटर (DCHC Center) तसेच करोना सेंटर वैद्यकिय अधिकारी व सेवकांअभावी बंद पडले आहेत. उपचार केंद्रच बंद करण्यात आल्याने पहिल्या व दुसर्‍या लाटेत स्वत:चे जीव धोक्यात घालून बाधीत रूग्णांवर उपचार करणार्‍या डॉक्टर व आरोग्य सेवकांना (Doctors and health workers) शासनाने गरज सरो वैद्य मरो या म्हणीनुसार वार्‍यावर सोडल्याने त्यांच्यावर उपासमारीचे संकट ओढवले तर दुसरीकडे बाधीत नागरीकांचे उपचार केंद्रच (Treatment center) बंद झाल्यामुळे हाल होत आहेत.

गत काही दिवसापासून शहर-परिसरात पुन्हा करोना संक्रमणाचा धोका (Risk of corona infection) वाढला आहे. मात्र शहरात खाजगी रूग्णालयांमध्ये करोना बाधितांवर अधिकृतपणे उपचाराची सुविधा उपलब्ध नसल्याने जनतेसमोर पुन्हा आरोग्याचे संकट उभे ठाकले आहे. शहरात स्वच्छतेचे उडालेले धिंडवडे तसेच करोना संक्रमण रोखण्यासाठी लादलेले निर्बंध शिथील करण्यात आल्याने तसेच विविध उत्सव व सणांच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत गर्दी पुन्हा जैसे थे झाली आहे.

सुरक्षित अंतर राखण्याच्या नियमांचे पालन नागरीक करीत नसून नियम तोडणार्‍यांविरूध्द पालिका अथवा पोलीस (Police) प्रशासन कारवाई करीत नसल्याने करोना नियमांचा संपुर्ण फज्जा शहरात उडाला आहे. त्यामुळे करोना संशयित रूग्णाबरोबर शहरात चिकनगुनिया(Chikungunya), मलेरिया (Malaria), डेंग्यू (Dengue) आदी रूग्णांचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

गत महिन्यात शहरात बाधीत रूग्णांचे प्रमाण शून्यावर आले होते. त्यामुळे जनतेसह यंत्रणेला शहर करोनामुक्त होत असल्याचा मोठा दिलासा मिळाला होता. मात्र करोना नियमांचे नागरीकांतर्फे होत असलेले उल्लंघन तसेच आरोग्य यंत्रणेच्या विस्कळीत कारभारामुळे संक्रमण पुन्हा वाढत असल्याचे दिसून येत आहे. करोना संशयित रूग्ण स्वॅब देण्यासाठी उपजिल्हा रूग्णालयात जात आहे.

मात्र तेथे स्वॅब घेतले जात नसून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याच्या तक्रारी रूग्णांतर्फे केल्या जात आहेत. यापुर्वी लस उपलब्ध नसल्याच्या कारणावरून लसीकरण मोहिम थंडावली होती. मात्र आता भरपूर लस उपलब्ध झाली असतांना इंजेक्शनसाठी वापरली जाणारी सिरीज संपल्यामुळे गत दोन दिवसापासून लसीकरणच ठप्प झाले आहे. दुसर्‍या डोससाठी कोव्हॅक्सिन लस उपलब्ध नाही.

तसेच कधी येणार ते सांगितले देखील जात नाही अशी तक्रार अनेक नागरीकांतर्फे केली जात आहे. त्यामुळे वरिष्ठ आरोग्याधिकार्‍यांनी या समस्येची दखल घेत इंजेक्शनच्या सिरीज तसेच कोवीशिल्ड (Covishield) व कोव्हॅक्सिनच्या (covacin) लसी उपजिल्हा रूग्णालयात उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नागरीकांतर्फे केली जात आहे.

सिरीजचा साठा संपुष्टात आल्याने लसीकरण एक दिवसासाठी बंद ठेवावे लागले होते. मात्र आज सिरीजचा साठा उपलब्ध झाला असून उद्यापासून उपजिल्हा रूग्णालयात लसीकरण नेहमीप्रमाणे सुरू होईल.

- डॉ. जगताप तालुका वैद्यकिय अधिकारी

Related Stories

No stories found.