माने नगरला लसीकरण सुरू; पहिल्याच दिवशी दीडशे नागरिकांना लस

माने नगरला लसीकरण सुरू; पहिल्याच दिवशी दीडशे नागरिकांना लस

पंचवटी | वार्ताहर Panchvati

प्रभाग क्र.३ मधील मानेनगर (Mane Nagar) येथील समाज मंदीरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण (Covid 19 Vaccination) केंद्र सुरू करण्यात आले असून, सुमारे १४० नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे...

रासबिहारी मेरी लिंक रोडवरील (Rasbihari Meri link road) माने नगर येथील समाज मंदीरात लसीकरण केंद्र सूरु व्हावे अशी मागणी नगरसेविका प्रियंका माने (Corporator Priyanka Mane) यांनी केली होती. त्यानुसार शनिवारी (ता. ३) पासून लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे.

याठिकाणी या दिवशी रोजी सकाळी अकरा ते दुपारी दोनपर्यंत सर्व गटांतील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती माने यांनी दिली. लसीकरणाच्या १८ ते ४४ वयोगटातील व ४५ वयापुढील सर्वांचेच लसीकरण करण्यात येणार आहे.

परिसरातील नागरिकांनी आधारकार्ड घेऊन नगरसेविका माने यांच्या कार्यालयात येऊन कूपन घ्यावे आणि दिलेल्या वेळेत माने नगर येथील समाज मंदीरात लसीकरणाचा लाभ घ्यावा, येताना मास्क लावून यावे व लसीकरणाच्या ठिकाणी सोशल डिस्टन्ससह शासकीय नियमांचे पालन करावे, असे आवाहन नगरसेविका प्रियंका माने, धनंजय माने यांनी केले आहे.

यावेळी प्रभागातील महिलेचे लसीकरण करून मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी आरोग्य विभागाचे डॉ. विजय देवकर, डॉ देवेंद्र धिवरे, व्यवस्थापक मंगेश चव्हाण, डॉ प्रियंका नेर, स्टाफ नर्स शीतल आढाव, दमयंती देशमुख, नर्स अलका गावित आदी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com