'मिशन कवच कुंडल' घरोघरी

'मिशन कवच कुंडल' घरोघरी

वाजगाव | वार्ताहर Vajgaon-Deola

राज्यातील जास्तीत जास्त नागरिकांना कोविडची (corona) लस (vaccination) देण्याच्या दृष्टीनं राज्यातील महाविकास आघाडी सरकारनं (Mahavikas Aghadi government) सात दिवसांच्या "मिशन कवच कुंडल" (Mission Kavach Kundal) ची घोषणा केली आहे.

त्या अनुषंगाने देवळा तालुका (deola taluka) आरोग्य अधिकारी डॉ.सुधीर पाटील (Health Officer Dr. Sudhir Patil) यांचे मार्गदर्शनाखाली, खर्डा आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या वाजगाव (vajgaon) आरोग्य वर्धिनी उपकेंद्रात "मिशन कवच कुंडल" अंतर्गत गावातील प्रत्येक वाडी वस्ती, आदिवासी वस्तीनमध्ये आठोड्याभरासाठी कोरोना लसीकरण (corona vaccine) प्रत्येक दिवस १०० हुन अधिक लसीकरण करण्याचे नियोजन केले असून दोन दिवसीय लसीकरणात जास्तीत जास्त आदिवासी बांधवांनी लसीकरण केल्याचे चित्र वाजगाव येथे दिसून आले.

राज्यात करोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी राज्य सरकार (state government) सजग आहे. तिसरी लाट येऊ नये व करोना हद्दपार व्हावा या दृष्टीनं सर्व प्रयत्न सुरू आहेत. दि.८ ऑक्टोबर पासून ते दि. १४ ऑक्टोबर असे सात दिवस राज्यात "मिशन कवच कुंडल" राबवण्यात येण्याच्या प्राप्त सूचनांनुसार देवळा तालुक्यातील खर्डा प्राथमीक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिक डॉ.संतोष अडे व डॉ.अलका सपकाळे यांचे मार्गदर्शनाखाली

वाजगाव आरोग्य वर्धिनी उपकेंद्राचे समूह आरोग्य अधिक डॉ.प्रितम आहेर, आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत सोनवणे, आरोग्य सेविका मीनाक्षी पगार यांनी आपल्या टीम सोबत वाजगाव व वडाळे गावतीक प्रत्येक वाडी वस्तीत कोरोना लसीकरण करण्यासाठी गावातील वाडी वस्तीत प्रत्यक्ष नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांना लसीकरणाचे फायदे समजावून सांगितले शिवाय आरोग्य टीईमच्या या आवाहनास स्थानिक आदिवासी बांधवांनी लसीकरण करून चांगला प्रतिसाद दिला.

परिणामी गावातील जास्तीत जास्ती आदिवासी बांधवांनी लसीकरण केल्याने वाजगाव ९९ टक्के व वडाळा १०२ टक्के टप्पा गाढला आहे. लसीकरणासाठी डॉ.प्रीतम आहेर, डॉ.प्रशांत सोनवणे, मीनाक्षी पगार, शिक्षण किरण पवार, ग्रामपंचायत लिपिक (शानु) एस.ए. देवरे, ज्योती आहेर आशा, प्रमिला मंगर आशा, ज्योती केदारे आशा, सिमा मोरे अंगणवाडी कार्य., माया उशिर, चित्रा ठाकरे आदी परिश्रम घेत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com