नाशकात उद्या ९२ केंद्रांवर लसीकरण

प्रत्येक केंद्रावर ७० डोस उपलब्ध असणार
नाशकात उद्या ९२ केंद्रांवर लसीकरण

नाशिक | Nashik

शहरात (Nashik City) कोव्हीशील्डचे (Covishiled) ६ हजार ४४० एवढे लसीकरण (Corona Vaccination) होणार असल्याची माहिती महापालिकेतर्फे (Nashik Mahapalika) देण्यात आलेली आहे.

एकूण ९२ लसीकरण केंद्रांवर हे लसीकरण होणार असून प्रत्येक केंद्रावर ७० डोस (Corona Vaccine) उपलब्ध राहणार आहे. नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये असे आवाहन देखील महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

शहरात गेल्या काही दिवसांपासून लशींचा तुटवडा जाणवत होता; मात्र, लस प्राप्त झाल्यानंतर त्यांचे नियोजन करण्यात येऊन महापालिकेच्या विभागांमधील लसीकरण केंद्रावर सामान वाटप करण्यात आले आहे.

यामध्ये नाशिक पश्चिम विभागातील १५ केंद्रावर, नाशिकरोड विभागातील (Nashikroad) १९ केंद्रांवर, नवीन नाशिक (New Nashik ) विभागातील २४ केंद्रावर, पंचवटी विभागातील (Panchavti )१६ केंद्रांवर, सातपूर (Satpur) विभागातील १३ केंद्रांवर तर पूर्व विभागातील १६ केंद्रांवर हे लसीकरण होणार आहे.

कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोस साठी इंदिरा गांधी रुग्णालय, समाज कल्याण तसेच कामगार कल्याण रुग्णालय येथे उपलब्ध असल्याचे देखील महापालिकेतर्फे कळविण्यात आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com