पदवीसोबत यूपीएससीत तयारी उपयुक्त : डॉ.भोसले

पदवीसोबत यूपीएससीत तयारी उपयुक्त : डॉ.भोसले

सिन्नर । प्रतिनिधी Sinnar

पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण (Undergraduate and postgraduate education) घेतल्यानंतर पुढे काय? असा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांच्या (students) मनामध्ये निर्माण होतो. महाराष्ट्रीयन (maharashtra) विद्यार्थ्यांची (students) मानसिकता पदवीनंतर करिअरच्या विविध मार्गांचा शोध घेण्याची असल्याने यूपीएससी (UPSC) सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा टक्का अजूनही बराच कमी आहे.

पदवीच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतानाच या परीक्षांची तयारी सुरू केल्यास अगदी वयाच्या एकविसाव्या वर्षीही यूपीएससी परीक्षा (UPSC Exam) उत्तीर्ण होता येते असे प्रतिपादन पूर्व आय. ए. एस. प्रशिक्षण केंद्रचे (I. A. S. Training Center) संचालक डॉ. मालोजीराव भोसले (Dr. Malojirao Bhosale) यांनी केले. येथील गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला (Guruvarya Mamasaheb Dandekar Art), भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात (Bhagwantrao Waje College of Commerce and Science) आयक्यूएसी (IQAC) व करिअर कट्टा (Career katta) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्पर्धा परीक्षा उद्बोधन वगात बोलत होते.

अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पी. व्ही. रसाळ होते. व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ.डी.एम.जाधव, प्रा.आर.व्ही.पवार, आयक्यूएसीचे समन्वयक प्रा.डी. एस. सानप, करिअर कट्टाचे समन्वयक प्रा.आर.एम.आंबेकर, स्टाफ सेक्रेटरी डॉ.एस.एन.पगार, डॉ. सी. ई. गुरुळे उपस्थित होते. ग्रामीण भागातील मुले हुशार असतात. मात्र, त्यांना मार्गदर्शन मिळत नाही.

इंग्रजीविषयी त्यांच्या मनामध्ये न्यूनगंड असतो. अशा वेळी राज्य सरकारने (central government) सुरू केलेल्या आयएएस पूर्व प्रशिक्षण देणार्‍या विविध संस्थांमध्ये प्रवेश घेतल्यास सरकार राहण्या-खाण्यासह अभ्यासासाठी सगळ्या सोयी सुविधा मोफत उपलब्ध करून देते. याचा विद्यार्थ्यांनी लाभ उठवावा व महाविद्यालयातील करिअर कट्टाचे समन्वयक व सर्वच प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांशी (students) हितगुज करून हुशार विद्यार्थ्यांना हेरून त्यांना या संस्थांविषयी माहिती द्यावी असे आवाहन त्यांनी केले.

यूपीएससी पास होण्यासाठी इंग्रजी आपल्याला समजेल या पातळीवर आले तरीसुद्धा फारशी अडचण येत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांचे निरसन केले. यूपीएससी सारख्या परीक्षा पास होण्यासाठी शारीरिक आणि मानसिक आरोग्य अत्यंत महत्त्वाचे आहे. आयएएस पूर्व प्रशिक्षण केंद्रांमधून विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या सुविधा सरकार पुरवते. त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना कष्ट केले तर पुढचे आयुष्य सुखात जाईल. सरकार लाखो रुपये आपल्यावर खर्च करायला तयार आहे. मात्र, त्याचा लाभ उठवायला विद्यार्थ्यांनी जागरूक असायला पाहिजे, असे डॉ. रसाळ म्हणाले. प्रास्ताविक डॉ.एस.एन.पगार यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ.सी.ई.गुरुळे यांनी करून दिला. सूत्रसंचलन प्रा. आर. एम. आंबेकर यांनी केले. डॉ. डी. बी. वेलजाळी यांनी आभार मानले.

Related Stories

No stories found.