शौचालयांचा वापर करुन गावांना स्वच्छतेतून समृध्दीकडे न्यावे - मित्तल

शौचालयांचा वापर करुन गावांना स्वच्छतेतून समृध्दीकडे न्यावे - मित्तल

नाशिक । प्रतिनिधी | Nashik  

शौचालयाचे (Toilet) महत्व आरोग्यासाठी अनन्यसाधारण असून गावाच्या आरोग्यासाठी शौचालयांचा नियमित वापर महत्वाचा आहे. लोकसहभागातून गावांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रत्येक गावाने नियोजन करावे. तसेच जिल्हयात बांधण्यात आलेल्या सर्व वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयांचा नियमित वापर करुन गावांना स्वच्छतेतून समृध्दीकडे न्यावे,असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (ZP CEO) आशिमा मित्तल (Ashima Mittal) यांनी केले.

स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) (Swachh Bharat Mission (Rural) अंतर्गत शनिवारी (दि.१९) जिल्हयात जागतिक शौचालय दिनानिमित्त स्वच्छता रन सह विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आले. नाशिक तालुक्यातील जाखोरी (Jakhori) येथे आयोजित कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सहभागी होऊन मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना त्यांनी गावातील सर्व शौचालयांचा वापर होणे तसेच गावातील सार्वजनिक शौचालयांची ग्रामंपचायतींच्या माध्यमातून नियमित स्वच्छता करणे आवयश्यक असल्याचे सांगितले. तसेच गावाच्या विकासासाठी प्रत्येकाने त्यांच्या परिने योगदान दिल्यास गावात मोठा बदल होऊ शकतो यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

तसेच आशिमा मित्तल यांच्या हस्ते आज जाखोरी येथे बांधण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयाचे फीत कापून उदघाटन करण्यात आले. तसेच गावामध्ये स्वच्छता रन, पथनाटय कार्यक्रम व स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. यावेळी गावातील लाभार्थ्यांना आरोग्य विभागाकडील गोल्डन कार्डचे वितरणही करण्यात आहे. तर जाखारी गावाच्या सरपंच मंगला जगळे यांनी स्चछता अभियानामुळे गाव स्वच्छ, सुंदर व सुशिक्षित झाले असून स्वच्छतेमुळे गावाचा कायापालट झाल्याचे सांगितले. प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य राहुल धात्रक यांनी केले. 

दरम्यान, या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ, गटविकास अधिकारी सारिका बारी, उपसरपंच ज्योती पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी शैलेश निकम, गटशिक्षण अधिकारी मीता चौधरी, कृषी अधिकारी विजय चौधरी, पशुधन विकास अिाकारी कविता पटोळे, विस्तार अधिकारी श्रीधर सानप, जे.डी. सोनवणे, ग्रामसेवक जगदीश कदम, ग्रामपंचाय सदस्य विश्वास कळमकर, जया चव्हाण, मधुकर पवार, प्रकाश पगारे, अर्पणा कळमकर, उज्वला जगळे यांच्यासह जिल्हा व तालुका कक्षातील समन्वयक उपस्थित होते.

खातेप्रमुखांचा सहभाग 

जिल्हयात १९ नोव्हेंबर रोजी जागतिक शौचालय दिनानिमित्ताने सर्व ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छता रन तसेच श्रमदान मोहिम, पथनाटय कार्यक्रम, स्वच्छता शपथ आदिंचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या सर्व खातेप्रमुखांनीही त्यांना नेमुण देण्यात आलेल्या तालुक्यातील गावात जाऊन शौचालय दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होऊन जनजागृती केली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांनी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चंद्राची मेट, ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र परदेशी यांनी इगतपूरी तालुक्यात, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी आनंदराव पिंगळे यांनी सिन्नर, महिला व बालविकास अधिकारी दिपक चाटे यांनी दिंडोरी तालुक्यातील कार्यक्रमात सहभाग घेतला. यासह सर्व खातेप्रमुख १५ तालुक्यातील कार्यक्रमात सहभागी झाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com