पर्यावरण संवर्धनासाठी सौर उर्जा वापरा

आयमा अध्यक्ष वरुण तलवार
पर्यावरण संवर्धनासाठी सौर उर्जा वापरा

सातपूर । प्रतिनिधी Satpur

राज्यात विजेचे व उद्योगांना लागणार्‍या वस्तूंचे दर सतत वाढत असून, भविष्यात उद्योग सुरळीत सुरु ठेवण्यासाठी उद्योजकांनी पर्यावरण संवर्धनासाठी (environmental conservation ) सौर उर्जा (solar energy ) पद्धतीचा वापर करावा. ज्यामुळे मोठया प्रमाणात प्रदूषण मुक्तीस वाव मिळणार असल्याचे आवाहन आयमा अध्यक्ष वरुण तलवार (AIMA President Varun Talwar ) यांनी केले.

आयमा रिक्रीशन सेंटर येथील के. आर. बुब कॉन्फरंस हॉलमध्ये आयमा व फ्रोनीस इंडिया, डब्ल्यूडआरएस एनर्जी, इलेक्ट्रोनिका फायनान्स यांच्या संयुक्त विद्यमाने चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात वरुण तलवार बोलत होेते.

यावेळी व्यासपीठावर आयमांचे सरचिटणीस ललित बुब, डब्ल्यूआरएस एनर्जीचे वेदांत राठी, अनिकेत महाजन, फ्रोनीस इंडियाचे प्रादेशिक प्रमुख सुनील मुसळे, फ्रोनीस इंडियाचे तांत्रीक विशेषज्ञ श्रीधर भामीदिपती, इलेक्ट्रोनीका फायनान्सचे कैलास शिंदे आदी उपस्थित होते.

यावेळी सुनील मुसळे यानी फ्रोनीस इंडिया कंपनीबाबत माहिती देताना उद्योजकांनी सोलर पद्धतीचा वापर कां केला पाहिजे? याचे महत्व उद्योजकांना समजावून सांगितले. तसेच श्रीधर भामीदिपती यांनी सोलर कपॅसिटी, सोलरची उपलब्धता, क्लीन एनर्जी, सोलर कार्याबद्दल लोड कपॅसिटी त्याचे फायदे सांगितले. उद्योजकांनी एकदाच खर्च केल्यानंतर 20 ते 25 वर्ष आपल्या वीजबिलांचा खर्च बचत करण्याचे आवाहन त्यानी यावेळी केले.

यावेळी कैलास शिंदेे यांनी सोलर पद्धतीसाठी उद्योजकांना फायनान्स करण्यासाठी इलेक्ट्रोनिका फायनान्स तयार असल्याचे सांगितले, त्याबाबत सर्व माहिती उद्योजकांना दिली.

यावेळी आयमा विश्वस्त समितीचे चेअरमन धनंजय बेळे, एमपीसीबीचे प्रादेशिक अधिकारी अमर दुरगुले, सुनील महाजन, बंडू चिंचोरे, विरळ ठक्कर, पी.जे.थोरात, डी.एन पुरी, बी.एम. फड, समाधान, महेंद्र, सचिन टेंबे, अश्विन देशमुख आदींसह उद्योजक उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार सरचिटणीस ललित बुब यांनी मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com