नाशिककर ! असा करा कोविड बेड आरक्षण सुविधेचा वापर

इथे पहा सविस्तर
नाशिककर ! असा करा कोविड बेड आरक्षण सुविधेचा वापर
कोविड सेंटर

नाशिक । Nashik

सध्या नाशिक शहरासह जिल्ह्यात करोनाचा कहर सुरु असून रुग्णांना बेड सुद्धा उपलब्ध होण्यास मुश्कील झाले आहे. गेल्या वर्षभरापासून नाशिक महापालिका प्रशासन, आरोग्य प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय यासाठी झटत आहेत. त्यानुसार विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.

नाशिक महापालिकेच्या माध्यमातून बेड आरक्षण करण्यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याठिकाणी आपणास ऑनलाईन बेड आरक्षण करता येणार आहे. त्याचबरोबर इतरही सुविधा याठिकाणी उपलब्ध आहेत.

नाशिक महानगरपालिकेच्या कोविड बेड आरक्षण सुविधेचा वापर कसा करावा. पहा पुढीलप्रमाणे

https://covidcbrs.nmc.gov.in/ या वेबसाईट ला भेट द्या.

त्यावरील Show Hospital Bed Status या टॅब वर क्लिक करा.

SEARCH ऑपशन मध्ये आपला विभाग टाका.

त्या विभागातील general/ icu/oxygen/ventilator यापैकी हवा असलेला बेड निवडा.

SEARCH टॅबवर क्लिक करा.

वरील प्रमाणे बेड उपलब्ध असलेल्या हॉस्पिटलची नावे व उपलब्ध बेडसंख्या दिसेल.

आपण संबंधित हॉस्पिटलशी संपर्क Click for Contact Details बटन वर क्लिक करून बेडबाबत अधिक माहिती घेऊ शकता.

नाशिक शहर कोविड संदर्भातील सर्व माहिती

https://covidnashik.nmc.gov.in:8002/covid-19.html

https://covidnashik.nmc.gov.in:8002/covid-19.html
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com