रोजगारासाठी स्वदेशी वस्तू वापरा : डॉ. पवार

रोजगारासाठी स्वदेशी वस्तू वापरा : डॉ. पवार

कळवण / पुनदखोरे । प्रतिनिधी / वार्ताहर | Kalwan / Pundkhore

देशाची अर्थव्यवस्था (economy) बळकट करण्यासाठी व स्थानिकाना रोजगार (Employment) मिळण्यासाठी सर्वांनी देशातील ग्रामीण भागात (rural area) तयार होणार्‍या

वस्तूंचा म्हणजे स्वदेशी वस्तूंचा (indigenous goods) जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Union Minister of State for Health and Family Welfare Dr. Bharti Pawar) यांनी केले.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या वाढदिवसापासून ते राष्ट्रपिता महात्मा गांधी (Father of the Nation Mahatma Gandhi) यांच्या जयंतीपर्यंत भारतीय जनता पार्टी (Bhartiya Janata Party) सेवा पंधरवडा हा उपक्रम राबवित आहे.

या उपक्रमांतर्गत तालुक्यातील कनाशी येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (Integrated Tribal Development Project) अंतर्गत केंद्रीयमंत्री डॉ. भारती पवार यांचे सूचनेनुसार आदिवासी महिला व पुरुष बचत गट समूहाकरिता आत्मनिर्भर स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यशाळा (Self-reliance Self-Employment Training Workshop) आयोजित करण्यात आली होती.

या कार्यशाळेच्या व्हिडीओ कॉन्फरन्स (Video conference) द्वारे दिल्ली येथून ऑनलाईन (online) उद्घाटनाप्रसंगी डॉ. पवार बोलत होत्या. पुढे बोलतांना डॉ. पवार म्हणाल्या की, आदिवासी महिला व पुरुषांच्या अंगी अनेक कलागुण आहेत. ते पारंपरिक पद्धतीने अनेक वस्तू बनवत असतात. त्यांना विज्ञानाची साथ मिळाली तर ते अधिक टिकावू वस्तू बनवू शकतात.

त्यांना त्यापासून चांगला रोजगार स्थानिक ठिकाणी उपलब्ध होऊ शकतो. तसेच त्यांनी तयार केलेल्या वस्तूं स्थानिक नागरिकांनी खरेदी कराव्यात जेणेकरून देशातील पैसा देशातच राहील व देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लागेल. व स्थानिक नागरिकांचे शहराकडेचे स्थलांतर थांबेल त्यामुळे सर्व नागरिकांनी स्वदेशी वस्तू वापरावर भर द्यावा.

देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली महासत्ता बनविण्यासाठी सहकार्य करावे. या कार्यशाळेत बचतगटाच्या आदिवासी महिला बांंधवांनी स्वतः तयार केलेल्या हस्तकला, वारली चित्रकला असलेल्या वस्तू, रानभाज्या, औषधी वनस्पती पासून तयार केलेल्या औषधे, बांबूपासून तयार केलेले आकाश कंदील व शोपीस वस्तू विक्रीसाठी ठेवल्या होत्या.

यावेळी आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष दीपक खैरनार, माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, व्यापारी आघाडीचे गोविंद कोठावदे, एस. के. पगार, वैद्यकीय आघाडीचे डॉ. अनिल महाजन, उपाध्यक्ष हेमंत पाटील. युवा मोर्चा अध्यक्ष हितेंद्र पगार, भूषण देसाई, शहराध्यक्ष सोहम महाजन, शेखर जोशी,

लोकेश पवार, अंबादास देसाई, जिल्हा सदस्य राजेंद्र ठाकरे, गोपीनाथ जाधव, राकेश गोविंद, गोरख गांगुर्डे, मोहन चौधरी, पोपट जगताप, विवेक पाटील आदींसह तालुक्यातील महिला व पुरुष बचत गटाचे सदस्य व सरपंच व विकास सोसायटीचे पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते, कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधाकर पगार यांनी केले तर सातपुते यांनी आभार मानले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com