"हेल्मेट वापरा..जीव वाचवा" रॅलीचे आयोजन

"हेल्मेट वापरा..जीव वाचवा" रॅलीचे आयोजन

नवीन नाशिक | प्रतिनिधी | Navin Nashik

वाहतूक नियम (Traffic rules) न पाळल्याने मोठ्या प्रमाणात अपघात (accidents) होतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी होते.

हे टाळण्यासाठी वाहनधारकांनी नेहमी जागृत राहावे असे मत वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक छाया देवरे (Chhaya Deore, Assistant Police Inspector, Traffic Branch) यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र पोलीस रस्ता सुरक्षा अभियाना (Maharashtra Police Road Safety Mission) अंतर्गत दि. ११ जानेवारी ते १७ जानेवारी २०२३ पर्यंत शहर वाहतुक शाखा युनिट ३ च्या वातीने पाथर्डी फाटा येथे "हेल्मेट वापरा जीव वाचवा" ("Use Helmet Save Life") या जनजागृतीपर रॅलीचे (rally) आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सपोनी देवरे बोलत होत्या. यावेळी सकाळी १० वा. पाथर्डी फाटा ते गुरुगोविंद सिंग महाविद्यालय पर्यंत रॅलीचे आयोजीत करण्यात आली.

वाहतूक पोलीस निरीक्षक पराग जाधव (Traffic Police Inspector Parag Jadhav) यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखविला. दुचाकी वाहन रॅलीमध्ये हेल्मेट (Helmet) परिधान केलेले वाहतूक पोलीस (Traffic Police) मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिंद्रा लॉजिस्टिकचे कर्मचारी व शाळकरी मुलांनी देखील यामध्ये सहभाग घेतला. वाहनांचे नियम, हेल्मेट बाबत जनजागृती आदीं संदर्भाचे घोषवाक्य फलकावर दिसून आले. यावेळी माईक वरून वाहतूक नियमा संदर्भात माहिती देण्यात आली.

यावेळी नागरिकांनी देखील या रॅलीचे जागो-जागी स्वागत केले.याप्रसंगी वाहतूक पोलीस निरीक्षक पराग जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक छाया देवरे, उपनिरीक्षक लक्ष्मण भामरे, हवालदार मुक्तार पठाण, शकील शेख,सोमनाथ सातपुते,पौलू दवरे,दत्तात्रय गवारे, राजू गवळी, संतोष चित्ते, विवेक भदाणे, बापू महाजन, योगेश रेवगडे, दौलत शिंदे,मुकेश महाले, शिवाजी गागरे,रमेश जाचक, किशोर सुर्यवंशी,उत्तम पाटील, आदीं उपस्थित होते.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com