आर्थिक व्यवहारात डिजीटल वापर करा: आरोटे

ठाणगाव येथे नाबार्ड शेतकरी मेळावा
आर्थिक व्यवहारात डिजीटल वापर करा: आरोटे

ठाणगाव । वार्ताहर | Thangaon

संगणक (computer) आणि स्पर्धेच्या युगात शेतीशी (farming) निगडीत असलेल्या ग्रामीण भागातील (rural area) प्रत्येक व्यक्तीचे आर्थिक व्यवहार (Financial transactions) विनाविलंब होणे गरजेचे आहेत.

त्यासाठी प्रत्येक व्यक्तीने डिजीटल पध्दतीने व्यवहार (Digital transactions) केले पाहीजे. डिजीटल व्यवहार 24 तास कधीही करु शकता असे प्रतिप्रादन नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विभागीय अधिकारी भरत आरोटे (Nashik District Central Bank Divisional Officer Bharat Arote) यांनी केले.

ठाणगाव (Thangaon) येथे जिल्हा बँक शाखा, सोसायटीतर्फे झालेल्या शेतकरी मेळाव्यात (Farmers meeting) ते बोलत होते. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (National Agricultural and Rural Development Bank) तथा नाबार्डच्या (NABARD) 40 व्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक आदिनाथ शिंदे होते. प्रमुख पाहुणे म्हणून बँक निरिक्षक राजेश नवाळे, कैलास निरगुडे, गंगाधर शिंदे, किरण महात्मे,

अनिल सानप, दिलीप शिंदे, वाय. एफ. धवल, समाधान वांरुगसे उपस्थित होते. शाखा व्यवस्थापक गंगाधर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अनिल शिंदे , केशव सहाणे, जयराम शिंदे, डी. एम. आव्हाड, प्रतिक शिंदे, नामदेव काकड, हरिभाऊ काकड, दत्तू टापसे, सुभाष सोनवणे, दशरथ शिंदे यांच्यासह आडवाडी, पाडळी, हिवरे, पिंपळे, टेंभुरवाडी सोसायटीचे संचालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

व्यवहार समजून घ्यावेत

स्पर्धेच्या युगात कृषी क्षेत्रात प्रत्येकाला आर्थिक व डिजीटल साक्षर होणे गरजेचे आहे. आपले आर्थिक व्यवहार संगणक प्रणालीद्वारे समजून घेता आले पाहीजे असे आरोटे यांनी सांगितले. याचा फायदा भावी काळात होणार असून आतापासून याची सुरुवात न केल्यास पुढे अडचणींना सामोरे जावे लागू शकते असेही ते म्हणाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com