पिक उत्पन्न वाढीस विकसित कृषी तंत्रज्ञानाचा वापर करा

पिक उत्पन्न वाढीस विकसित कृषी तंत्रज्ञानाचा वापर करा

बाजार समिती सभापती जाधव यांचे प्रतिपादन

मालेगाव । प्रतिनिधी | Malegoan

निसर्गाचा (Nature) लहरीपणा तसेच उपलब्ध पाण्याची स्थिती (Available water conditions) लक्षात घेता पारंपारिक पध्दतीने शेती करणे (Farming) परवडणारे राहिलेले नाही...

शेतीमालाच्या उत्पादन वाढीच्या (Increasing agricultural production) दृष्टीकोनातून कृषि विद्यापिठाने (Agricultural University) विकसित केलेल्या नवनवीन कृषितंत्रज्ञानाचा जास्तीतजास्त वापर शेतकर्‍यांनी करणे काळाची गरज बनली असल्याचे प्रतिपादन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव (Rajendra Jadhav) यांनी केले.

हरित क्रांतीचे प्रणेते आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक (Vasantrao Naik) यांच्या जयंतीचे औचित्य साधून तालुक्यातील देवारपाडे येथील नानाजी घुमरे यांच्या शेतमळ्यात कृषी दिन व कृषी संजिवनी समारोप कार्यक्रमात ते बोलत होते.

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करतांना सभापती राजेंद्र जाधव बोलत होते. पंचायत समितीच्या सभापती सुवर्णा देसाई, गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे, कृषी अधिकारी दिलीप देवरे, जि.प. सदस्य दादाजी शेजवळ, भिकन शेळके, लकी गिल, विजय देसले, प्राचार्य डॉ. विश्वनाथ शिंदे, प्रमोद निकम, निळकंठ निकम, संजय निकम, दिपक मालपुरे, सरपंच भाऊसाहेब सुर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.

बाजारामध्ये ज्या शेतमालाला अधिक मागणी आहे त्याचे उत्पादन शेतकर्‍यांनी वाढविल्यास आर्थिक प्रगतीला निश्चितच संधी मिळणार असल्याचे स्पष्ट करत सभापती जाधव पुढे म्हणाले, उत्पादन वाढीसाठी वेगवेगळे उपक्रम कृषि विभागातर्फे सातत्याने राबविले जात आहे.

विशेषत: आधुनिक तंत्रज्ञानाव्दारे शेती करण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे. ज्या ठिकाणी नवीन तंत्रज्ञानाचा वापर झाला तेथे शेतमालाचे उत्पादन निश्चित वाढल्याचे दिसून येते. त्यामुळे शेतकर्‍यांनी उत्पादन वाढीसाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा, असे आवाहन त्यांनी शेवटी बोलतांना केले.

प्रारंभी कमलेश घुमरे या शेतकर्‍याने घरगुती पध्दतीने तयार केलेली व कमी खर्चावर आधारीत कापूस बियाणे टोकन यंत्र, खत वापर यंत्र, फवारणी यंत्र, शेवगा शेंगा तोडणी यंत्र, पेरणी यंत्र, विविध कृषि उपकरणांची प्रात्याक्षिके शेतकर्‍यांना दाखविण्यात आली. यानंतर खरीप हंगामाचा मृग पेरणीचा शुभारंभ सभापती जाधव यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

कृषी दिन आणि कृषी संजीवनी मोहीम समारोप कार्यक्रमाचे मार्गदर्शन कृषी अधिकारी दिलीप देवरे यांनी केले, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विश्वनाथ शिंदे (Dr. Vishwanath Shinde) यांनी कृषी पिक नियोजनाबाबत माहिती दिली.

शास्त्रज्ञ विशाल चौधरी (Scientist Vishal Chaudhary) यांनी जैविक खताचा वापर याबाबत सखोल मार्गदर्शन केले. रब्बी हंगामात प्रथम तीन उत्कृष्ट गहु व हरभरा पिक उत्पादन घेणार्‍या तसेच पिक स्पर्धेत सहभाग घेणार्‍या शेतकर्‍यांना प्रमाणपत्र देण्यात आले.

बोरी अंबेदरी आणि दहिकुटे प्रकल्पातंर्गत तपासणी केलेल्या माती नमुने, जमीन आरोग्य पत्रिका वितरण करण्यात आली. आदित्य कृषी एजन्सी यांच्याकडून शेतकर्‍यांना मोफत जैविक खत, पीएसबी वाटप करण्यात आले. कृषी विषयक कार्यक्रमाची माहिती तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे (Balasaheb Vyavhare) यांनी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com