जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींतील प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवा: आयमा

जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींतील प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवा: आयमा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींतील (Industrial estates) अनेक समस्या प्रलंबित असून त्या तातडीने सोडवा अशी मागणी

आयमाच्या (AIMA) पदाधिकाऱ्यांनी एमआयडीसीच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोनाली मुळे (MIDC Deputy Chief Executive Officer Sonali Mule) यांच्याकडे चर्चेप्रसंगी केली. सिन्नर औद्योगिक वसाहत (Sinnar Industrial Estate) एनएमआरडीएमध्ये (NMRDA) येत असून

शासनाच्या नियमाप्रमाणे या भागात नवीन प्रकल्पासाठी गुंतवणूक करायची असेल तर नवीन झोनप्रमाणे त्यासाठी स्लॅब पाडण्यात आले आहेत. ए झोन १०० कोटी, बी झोनसाठी ६० कोटी, सी झोनसाठी ४० कोटी व डी प्लस झोनसाठी २० कोटी अशा अटी टाकण्यात आल्या आहेत व भूखंड क्षेत्राची मागणी १० हजार चौरस मीटरच्या पुढे असावी अशी असे त्यात नमूद करण्यात आले आहे.

भूखंड क्षेत्रानुसार गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असले तरी या अटी उद्योजकांच्या दृष्टीने अत्यंत जाचक असून त्यात शिथिलता आणण्याची मागणी निवेदनात (memorandum) करण्यात आली आहे. दिंडोरी औद्योगिक वसाहतीत (Dindori Industrial Estate) एमआयडीसी कडून भूखंड आराखडा तयार करण्यात आला आहे. पण येथे येणाऱ्या उद्योजकांना एमआयडीसीकडून गुंतवणुकीसाठी २० कोटी रुपये आवश्यक असण्याची अट टाकली आहे.

छोट्या उद्योजकांनाही येथे भूखंड मिळावेत व उद्योग व्यवसाय इतरत्र जाणार नाहीत याचा सारासार विचार करून एमआयडीसीने येथे गुंतवणुकीसाठी असलेल्या अटीत लवचिकता आणावी, असेही यावेळी आयमा (AIMA) पदाधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले. औद्योगिक वसाहतींतील उद्योजकांना उद्योग विस्तारासाठी एमआयडीसीकडून भूखंड वितरित करण्यात आले व बांधकाम करून उद्योग व्यवसाय सुरु करण्यास दोन वर्षाची मुदत दिली आहे.

त्यानुसार काही उद्योजकांनी प्लॅननुसार बांधकाम पूर्ण केले असून काही उद्योजकांचे बीसीसी (BCC) घेणे बाकी आहे. अशा उद्योगांना प्रत्येक वर्षासाठी दंड आकारणी वेगवेगळी ठेवली आहे ती अवाजवी व उद्योजकांना न परवडणारी आहे. सर्वप्रकारच्या अ,ब,क,ड स्तरातील भूखंडासाठी वेगवेगळे दर आणि ते कमी जास्त आहेत.

या सर्वांसाठी एकच नियम लावून त्या प्रमाणात दंड आकारणी ठेवावी व ती वेगवेगळ्या भूखंडांसाठी ५ ते १० टक्केच्यावर नसावी अशी विनंतीही आयमा पदाधिकाऱ्यांनी यावेळी केली. यावेळी आयमा अध्यक्ष निखील पांचाळ, सरचिटणीस ललित बूब , बीओटी चेअरमन ज्ञानेश्वर गोपाळे तसेच पदाधिकारी व उद्योजकांनी सहभाग घेतला.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com