नाशिकमध्ये प्रथमच UPSC सेंटर; प्रशासनाची तयारी पूर्ण

नाशिकमध्ये प्रथमच UPSC सेंटर; प्रशासनाची तयारी पूर्ण

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

केंद्रीय लोकसेवा आयोगाची परिक्षा (UPSC) येत्या ऑक्टोबरमध्ये होणार आहेत. ही परीक्षा आयोगाच्या मानांकनानुसार जिल्हा प्रशासन यशस्वी करून दाखवेल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी सूरज मांढरे (Nashik District Collector Suraj Mandhare) यांनी आयोगाचे उपसचिव एस. के. गुप्ता (S. K. Gupta) यांना दिली...

नाशिकमध्ये पहिल्यांदाच केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून सिविल सर्व्हिस पूर्व परीक्षा 10 ऑक्टोबरला होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आयोगाचे उपसचिव एस. के. गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात (Nashik Collector's Office) प्रशिक्षण देण्यात आले.

या प्रशिक्षणाकरिता केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून अवर सचिव दीपक पंत, उज्वल कुमार, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी निलेश श्रींगी यांच्यासह प्रशिक्षणासाठी निश्चित करण्यात आलेल्या बारा केंद्रांचे प्राध्यापक उपस्थित होते.

परीक्षेसाठी नाशिकमध्ये एकूण 12 केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. साधारण 4 हजार 400 परीक्षार्थ्यांनी नाशिक केंद्र हा पर्याय निवडलेला आहे. विशेष बाब म्हणजे परीक्षेसाठी दिव्यांग परीक्षार्थींसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याचे निर्देश गुप्ता यांनी दिले.

आयोगाकडून दर्शविण्यात आलेल्या अपेक्षांबद्दल मांढरे यांनी यंत्रणा सज्ज असल्याची ग्वाही दिली. निवासी उपजिल्हाधिकारी डोईफोडे यांनी यावेळी आभार मानले.

दृष्टिक्षेपात प्रशिक्षण

  • केंद्रीय लोकसेवा आयोगाची नाशिक जिल्ह्यात पहिल्यांदा पूर्व परिक्षा

  • जिल्ह्यातून 12 परिक्षा केद्रांची निवड

  • 4 हजार 400 विद्यार्थी देणार परिक्षा

  • दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असेल स्वतंत्र व्यवस्था

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com