उपनगर खुनातील सुत्रधार जेरबंद

मध्यवर्ती गुन्हे शाखेची कारवाई
उपनगर खुनातील सुत्रधार जेरबंद

नाशिक । Nashik

दिवाळीच्या दिवशी देवळातील 22 वर्षीय योगेश चायल याचा उपनगर परिरसरात खून करणार्‍या व फरार मुख्य सुत्रधारास नाशिक शहर मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली.

हर्ष ऊर्फ टोनू सुरेश म्हस्के-पाईकराव (वय 19, रा. जेल रोड पाण्याच्या टाकीजवळ) असे अटक करण्यात आलेल्याचे संशयिताचे नाव आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार 15 नोव्हेंबर रोजी देवळाली गावातील योगेश पन्नालाल चायल याच्यावर हल्लेखोरांनी चाकू व कोयत्याने वार केले होते. यात त्याचा मृत्यू झाला. हल्ला केल्यानंतर हल्लेखोर फरार झाले होते.

याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानुसार मध्यवर्ती गुन्हे शाखेने तपास सुरु केला होता. या गुन्ह्यातील मुख्य संशयित हर्ष ऊर्फ टोनू सुरेश म्हस्के-पाईकराव अद्याप फरार होता. तो उपनगरमध्ये येणार असल्याची माहिती पथकातील गंगाधर केदार यांना मिळाली होती.

त्यानुसार वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनलाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक डॉ. सिताराम कोल्हे, त्यांच्या पथकातील कुंदन सोनोन, गंगाधर केदार, सचिन अजबे यांच्या पथकाने सोमवारी (दि.23) रात्री सापळा रचून त्यास अटक केली.

योगेश चायल खून प्रकरणातील मुख्य आरोपी हर्ष म्हस्के हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर उपनगर व दिंडोरी पोलीस ठाण्यात बलात्कार, जबरी चोरी व खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. गुन्हे करुन तो फरार झाला होता.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com