नाशिक | प्रतिनिधी

शहरातील नाशिक पुणे रोड येथील उपनगर जवळच्या एअर फोर स्टेशनमध्ये आज पहाटेच्या सुमारास एक बिबट्या जेरबंद झाला.

गेल्या काही दिवसांपासून याठिकाणी बिबट्याचा संचार येथील लष्करी जवानांना दिसून येत होता. त्यानुसार याठिकाणी नाशिक परिक्षेत्रातील वनअधिकाऱ्यांच्याकडून पिंजरा लावण्यात आला होता.

आज सकाळी हा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. याबाबतची माहिती नाशिक वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे, वनपरिमंडळ अधिकारी अनिल अहिरराव, वनरक्षक उत्तम पाटील यांच्या मदतीने बिबट्या जेरबंद करण्यात आला. या बिबट्याला गंगापूर रोपवाटिका येथे ठेवण्यात आले आहे.