आगामी निवडणूक महत्वाचीः आ.पवार

आगामी निवडणूक महत्वाचीः आ.पवार

पिंपळगाव ब.। Pimpalgaon Baswant

महाराष्ट्राची (Maharashtra) सध्याची राजकीय परिस्थिती पाहता महाराष्ट्रातील जनतेचा राज्यातील राजकारणावर (politics) विश्वास राहिला नाही.

राज्यात नुकत्याच घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता देखील त्रस्त झाली आहे. सर्वांचाच न्यायव्यवस्थेवर दृढ विश्वास आहे. मात्र, याउलट दुसरीकडे वेळेवर निर्णय होत नाही. कालपरवाच्या घटनेसंदर्भात निवडणूक आयोगाने (Election Commission) दिलेला निर्णय आणि त्यातून घडणार्‍या घडामोडी हे सगळे पाहता टिकविण्यासाठी आगामी निवडणुका (election) अतिशय महत्त्वाच्या ठरतील असे प्रतिपादन कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार तथा राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार (MLA and youth leader of NCP Rohit Pawar) यांनी केले आहे.

आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी पिंपळगाव बाजार समिती, स्व.अशोकराव बनकर सह. पतसंस्थेला सदिच्छा भेट दिली. यावेळी पतसंस्थेचे चेअरमन रामभाऊ माळोदे, बाळासाहेब बनकर, गफ्फार शेख यांच्या हस्ते आमदार रोहित पवार यांचा करण्यात आला. याप्रसंगी आमदार दिलीप बनकर, अरविंद जाधव, भूषण धनवटे, चंद्रकांत राका, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, बाजार समिती उपसभापती दीपक बोरस्ते आदी उपस्थित होते.

यावेळी आमदार रोहित पवार म्हणाले की, शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यापासून एकही मोठा धोरणात्मक निर्णय झाला नाही. या सरकारकडून धरसोड वृत्तीने कामे सुरू जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे. शेतकरी हितासाठी मोठे काम उभारण्याची गरज असल्याचे आमदार पवार म्हणाले.

याप्रसंगी उमेश पाटील, ग्रा.पं. सदस्य गणेश बनकर, संचालक रामभाऊ माळोदे, सोहनलाल भंडारी, सुरेश खोडे, निवृत्ती धनवटे, विजय कारे, नारायण पोटे, अनिल बोरस्ते, सचिन पवार, दिनेश धात्रक, श्रीकांत वाघ, गणेश गायधनी, भूषण शिंदे, प्रफुल पवार, चोरडिया, बाळा बनकर, बाजार समिती सचिव संजय लोंढे, एस.एस. गीते आदींसह बाजार समिती कर्मचारी, शेतकरी, व्यापारी, हमाल, माथाडी, पतसंस्थेचे संचालक कर्मचारी, सभासद उपस्थित होते.

विद्यार्थ्यांशी संवाद

आमदार रोहित पवार (rohit pawar) यांनी भीमाशंकर इंग्रजी माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयास भेट देवून तेथील परिसर, शैक्षणिक (education) वातावरण बघून समाधान व्यक्त केले. प्राचार्य मोरेश्वर पाटील त्यांचे स्वागत केले. तर संचालक उमेश जैन यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी रोहित पवार यांनी विद्यार्थ्यांना (students) अनेक प्रश्न विचारून त्यांच्या मनाचा शोध घेतला.

ग्रा.पं. सदस्य व संस्थेचे विश्वस्त गणेश बनकर, समता परिषदेचे सुरेश खोडे यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलतांना आमदार रोहित पवार म्हणाले की, ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण आमदार दिलीप बनकर यांनी भीमाशंकर शिक्षण संस्थेची स्थापना करून समाजातील तळातील घटकातील पाल्यासाठी अतिशय चांगले शिक्षण देण्याची व्यवस्था केली आहे.

विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे विशेष लक्ष देऊन आपल्या मातापित्यांचे स्वप्न साकार केले पाहिजे. ज्ञानाच्या पारंपरिक शाखा सोडून नवीन शाखांचा शोध घ्या. कारण आज आपण घेतलेले ज्ञान दहा पाच वर्षात कालबाह्य होत म्हणून स्वतःला नेहमी अद्ययावत ठेवा. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच आपल्या अंगी असलेल्या कौशल्य आणि क्षमतांचा विकास करण्याकडे भर दिला पाहिजे असेही आमदार पवार म्हणाले.

उपक्रमांचे कौतुक

आमदार रोहित पवार यांनी आमदार दिलीप बनकर यांच्या समवेत पिंपळगाव बाजार समितीच्या कांदा, टोमॅटो लिलावास भेट देत शेतकर्‍यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. बाजार समितीने शेतकर्‍यांसाठी 10 सुरू केलेली किसान भोजन थाळी, शेतकरी निवास, प्रशासकीय कार्यालय, व्यापारी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्पासह सर्वच पायाभूत सुविधांची पाहणी केली. तसेच, यावेळी त्यांनी शेतमाल लिलावाबाबत शेतकरी, व्यापारी, हमाल, माथाडी यांचेकडून माहिती घेतली. यावेळी त्यांनी आमदार बनकरांच्या कार्याचे कौतुक केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com