‘मातोश्री’वर अढळ निष्ठा : जगताप

‘मातोश्री’वर अढळ निष्ठा : जगताप

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

जुन्या निष्ठावंत शिवसैनिकांसाठी (shivsainik) हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) हे एकच साहेब असून त्यांची ‘मातोश्री’वर (Matoshri) अढळ निष्ठा आहे. निष्ठावंत शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सोबत असून बंडखोरांचे कृत्य काळिमा फासणारे असल्याची टीका शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख नथू जगताप यांनी केली.

कॅम्पातील शिवसेना कार्यालयात माजी तालुकाप्रमुख जगताप यांच्या अध्यक्षतेखाली आज तालुक्यातील जुन्य निष्ठावंत शिवसैनिकांची बैठक झाली. यावेळी मार्गदर्शन करताना जगताप बोलत होते. हिंदुत्वाच्या नावाखाली ईडी चौकशीचा (ED Inquiry) ससेमिरा टाळण्यासाठी शिंदे गटाने बंडखोरीचा खटाटोप केला असून त्यांना निष्ठावंत शिवसैनिक माफ करणार नाहीत, असेही जगताप यांनी नमूद केले.

यावेळी सुरेश पवार, विलास बिरारी, पद्माकर पवार, नथू देसले, कैलास तिसगे, संयोग निकम, विष्णू पवार, नंदलाल वर्मा, संजय बच्छाव आदींनी मनोगत व्यक्त करत सर्वांनी शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले.

येत्या काही दिवसांतील राजकीय घडामोडी पाहून निष्ठावंत शिवसैनिकांची पुन्हा बैठक घेत पुढील दिशा ठरवण्याचा तसेच 12 जुलैनंतर भव्य मेळावा घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. बैठकीस परशराम देसले, नाना शेवाळे, योगेश पाटील, शंकर पाटील, गणेश गायकवाड, शरद देसले, दिलीप देशमुख आदींसह जुने निष्ठावंत शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com