राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मेजर ध्यानचंद यांच्या पुतळ्याचे अनावरण

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मेजर ध्यानचंद यांच्या पुतळ्याचे अनावरण

इगतपुरी | प्रतिनिधी | Igatpuri

शहरातील क्रीडा संकुल (Sports complex) येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय महारा्ट्र राज्य पुणे अंतर्गत नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय (Nashik District Sports Officer Office) तसेच तालुका क्रीडा संकुल समिती इगतपुरी (Igatpuri) यांच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद (Major Dhyan Chand) यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वेगवेगळे खेळ आणि खेळांचे महत्व पटवून देण्यात आले. मेजर ध्यानचंद यांच्या पुतळ्याचे अनावरण आमदार हिरामण खोसकर (MLA Hiraman Khoskar)व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी व्हॉलिबॉल, कबड्डी खेळांचे उद्घाटन नारळ वाढवुन करण्यात आले. यावेळी आ. खोसकर व तहसिलदार कासुळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

दरम्यान, या कार्यक्रमाप्रसंगी तहसीलदार परमेश्र्वर कासुळे (Tehsildar Parasherwar Kasule) नगराध्यक्ष संजय इंदुलकर (Sanjay Indulkar) तालीम संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लहाने, नगरसेविका अपर्णा धात्रक तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टीळे, तालुका क्रीडा अधिकारी जाधव यांच्यासह सर्व क्रीडा शिक्षक उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com